Coronavirus Live Update: भारतात ५ तर जगभरात १० हजार मृत्यू

Coronavirus Live Update: भारतात ५ तर जगभरात १० हजार मृत्यू

Corona Live Updates: राज्यातील करोग्रस्तांचा आकडा ५३ वरून ६३वर!

करोना विषाणूमुळे भारतात पाच रुग्णांचा मृत्यू झाला असून जगभरात हा आकडा आता १० हजारांच्या पुढे पोहोचला आहे. आज सकाळी जयपूर येथे एका परदेशी महिलेचा करोनामुळे मृत्यू झाला. ही महिला इटली येथील पर्यटक असून ६९ वर्षांची होती. करोना आजारातून मुक्त झाल्यानंतरही या महिलेचा मृत्यू झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थोड्यावेळापुर्वीच सोशल मीडियावर लाईव्ह येऊन मुंबईतील लोकल सेवा आणि बस बंद करता येणार नसल्याचे सांगितले. अनेक अत्यावश्यक सेवा पुरविणारे कर्मचारी याच साधनातून प्रवास करतात. जर त्यावर बंदी आणली तर उपचार देण्यास अडचणी येतील, असे त्यांनी सांगितले.

हे वाचा – मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व कार्यालये बंद, सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या २५ टक्के करणार

 

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील मोठी घोषणा केली आहे. राज्यातील पहिली ते आठवी इयत्तेच्या परिक्षा रद्द केल्याचे त्यांनी जाहीर केले.

हे वाचा – Coronavirus: पहिली ते आठवीची परिक्षा रद्द

 

First Published on: March 20, 2020 2:30 PM
Exit mobile version