घरताज्या घडामोडीCoronavirus: पहिली ते आठवीची परिक्षा रद्द

Coronavirus: पहिली ते आठवीची परिक्षा रद्द

Subscribe

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिली ते आठवीची परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच नववी आणि अकरावीची उर्वरित पेपर हे १५ एप्रिल नंतर घेण्यात येणार असल्याच आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. याशिवाय दहावीचे शिक्षक सोडून सर्व शिक्षकांना वर्क फ्रॉम होमची सूचना देखील दिली आहे. तसंच दहावीची परिक्षा वेळापत्रकानुसार होती असं देखील वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

राज्यात दिवसेंदिवस करोनाग्रस्तांची संख्या वाढताना दिसत आहे. काल राज्यात करोनाग्रस्तांचा आकडा हा ४८ होत. आता हा आकडा ५२वर पोहोचला आहे. आज मुंबई, पिंपरी-चिंचवड आणि पुणे येथे प्रत्येकी एक-एक करोनाग्रस्त रुग्ण आढळला आहे.

- Advertisement -

येत्या रविवारी ‘जनता कर्फ्यू’

देशात करोना व्हायरसच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांना संबोधले. यावेळेस त्यांनी या जागतिक संकटाला सामना करण्यासाठी देशवासियांनी एकत्र राहून दृढ निश्चयानं उभं राहण्याचं आवाहन केलं. तसंच येत्या रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचं देखील त्यांनी आवाहन केलं आहे. सकाळी ७ वाजेपासून रात्री ९ वाजेपर्यंत सर्व देशवासियांनी २२ मार्चला जनता कर्फ्यू पाळायचा आहे. गेल्या २ महिन्यात लाखो लोकं रुग्णालयांत, विमानतळांवर, कार्यालयांमध्ये, शहराच्या गल्लीबोळात डॉक्टर, नर्स, हॉस्पिटलचा स्टाफ, सफाई कर्मचारी, सरकारी कर्मचारी, पोलीस कर्मचारी, माध्यम कर्मचारी, रेल्वे, बस कर्मचारी हे आपली पर्वा न करता दुसऱ्यांची सेवा करत आहेत. आजच्या परिस्थिती या सेवा खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे या लोकांचे आभार व्यक्त करण्यासाठी रविवारी संध्याकाळी ५ वाजता आपल्या घरातल्या दरवाजावर, खिडकीत उभं राहून ५ मिनिटं टाळी वाजवून, थाळी वाजवून, घंटी वाजवून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.


हेही वाचा – Coronavirus Effect – हे बेस्ट झालं! मुंबईच्या प्रदूषणात घट

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -