Corona Live Update: दुकानात गर्दी करु नका, जीवनावश्यक सेवा सुरुच राहणार – मुख्यमंत्री

Corona Live Update: दुकानात गर्दी करु नका, जीवनावश्यक सेवा सुरुच राहणार – मुख्यमंत्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील सोशल मीडियावर लाईव्ह येत जनतेशी संवाद साधला. लॉकडाऊन असला तरी लोकांना जीवनावश्यक सेवा, अत्यावश्यक सेवा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे लोकांनी उगाचच दुकानांमध्ये गर्दी करु नये, असे आवाहन ठाकरे यांनी केले.  
पुढील २१ दिवस कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महत्वाचे आहेत. या २१ दिवसांत आपण सावरलो नाही तर आपण २१ दिवस मागे जाण्याची शक्यता आहे. एक पंतप्रधान म्हणून नव्हे तर तुमच्या कुटुंबाचा सदस्य म्हणून हे आवाहन करत आहे की, पुढचे २१ दिवस तुम्हाला घरातून बाहेर पडायचे नाहीये. एका सोशल मीडियावरील बॅनरने माझे लक्ष वेधून घेतले आहे. त्यावर कोरोनाचा फुल फॉर्म लिहिला होता. कोरोना म्हणजे कोई रोडपे ना निकले… याचाच अर्थ करोनाला हरविण्यासाठी आता आपल्याला घरातून बाहेर पडायेच नाहीये, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आहे.  
महाराष्ट्रात करोनाचा प्रसार चिंताजनक स्तरावर आल्यामुळे संचारबंदी लागू केलेली आहे. त्यामुळे खासगी डॉक्टरांनी रुग्ण तपासणी (ओपीडी) बंद करु नये, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.  
करोना रुग्णांची देशभरात आणि राज्यात संख्या वाढत असतानाही एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यात ठिकठिकाणी उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णांपैकी आता १५ रुग्ण बरे झाले आहेत. तर ८ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. मात्र आता जास्त खबरदारी घ्यायची असून नागरिकांनी आता घराबाहेर न पडता या विषाणूचा संसर्ग इथेच थांबवावा, असे आवाहान सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.    
करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्ध ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी लागू केली असली तरी अजूनही अतिउत्साही लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. त्यांना लाठ्यांचा प्रसाद देण्यात येत आहे. एका बाजुला बळाचा वापर तर दुसऱ्या बाजुला क्रिएटिव्हीटी वापरत मुंबई पोलिसांनी लोकांना शहाणे करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यासाठी ट्विटरवर अनोख्या पद्धतीने एक ट्विट केले आहे.
सध्या राज्यात करोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दिवसेंदिवसे करोनाग्रस्तांची संख्या दुप्पट होत आहे. आतापर्यंत राज्यात करोनाग्रस्तांची संख्या ९७ इतकी झाली आहे. राज्य करोनाच्या तिसऱ्या फेज मध्ये प्रवेश करत आहे. त्यामुळे राज्य सरकाराने संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू केली आहे. तसंच प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा बंद आल्या आहेत.
Priyanka Shinde

आतापर्यंत राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या

मुंबई आणि उपनगर – ३८
पुणे – १९
पिंपरी-चिंचवड – १२
नवी मुंबई – ५
नागपूर – ४
यवतमाळ – ४
कल्याण – ४
सांगली – ४
अहमदनगर – २
रायगड+ पनवेल – २
ठाणे – २
औरंगाबाद – १
उल्हासनगर – १
रत्नागिरी – १
वसई-विरार – १
सातारा – २

Priyanka Shinde

राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा वाढला

सविस्तर वाचा –

CoronaVirus: पुण्यात तीन तर साताऱ्यात आणखी एक करोनाग्रस्त रुग्ण!
Priyanka Shinde

वांद्र्यातून डॉक्टरांसाठी असलेले २५ लाख मास्क जप्त करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली असून जवळपास १५ कोटी किंमतीचे मास्क जप्त करण्यात आले आहेत.

Priyanka Shinde

कोल्हापुरातील सीपीआर हॉस्पिटलमधून एका करोना संशयिताने पळ काढला आहे. दुबईवरून हा २८ वर्षीय करोना संशयित होता. सध्या तो पळून गेल्यामुळे पोलिसांची शोधण्याकरिता धावधाव सुरू आहे.

Priyanka Shinde

दुबई येथून आलेल्या एका कॅनडा येथील संशयास्पद रुग्णास ताब्यात

सविस्तर वाचा –

Coronavirus – दुबईवरून आलेला ‘तो’ लपून बसलेला उरणच्या हॉटेलमध्ये
First Published on: March 24, 2020 7:29 AM
Exit mobile version