पनवेल महानगरपालिका : अंथरूणाला खिळलेल्या रूग्णांचे कोविड लसीकरण 

पनवेल महानगरपालिका : अंथरूणाला खिळलेल्या रूग्णांचे कोविड लसीकरण 

अलिबाग तालुक्यात मिशन कवच कुंडल अंतर्गत लसीकरण सुरू

अंथरूणाला खिळलेल्या किंवा बेडरिडन रूग्णांचे लसीकरण करण्याचा निर्णय पनवेल महानगरपालिकेने घेतला आहे. अशा रूग्णांच्या संबधितांनी नजिकच्या महानगरपालिकेच्या नागरी आरोग्य केंद्राशी समन्वय साधावा, असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.अनेक कुटूंबामध्ये काही कारणाने अंथरूणावरती झोपून असलेले रूग्ण किंवा वयोवृध्द यांचे कोविड लसीकरण करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने एक पाऊल पुढे टाकले आहे. अशा नागरिकांना रूग्णालयात किंवा लसीकरण केंद्रावरती जाऊन लसीकरण करणे शक्य नसते. या रूग्णांना,वयोवध्द नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे.

आयुक्त श्री.गणेश देशमुख यांनी दिलेल्या निर्देशानूसार, बेडरिडन रूग्ण, वयोवृध्द नागरिकांना लसीकरण करण्यासाठी संबधितांनी जवळच्या नागरी आरोग्य केंद्राशी समन्वय साधून नोंदणी करावी, तसेच यावेळी बेडरिडन रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक असणार आहे. नागरी आरोग्य केंद्रातील विशेष पथकाच्या माध्यमातून बेडरिडन रूग्णांच्या घरी जाऊन त्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

कोविड लसीकरणामध्ये समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्याच्या दृष्टीने महापालिका प्रयत्न करत आहे. लसींच्या उपलब्धतेनूसार बेडरिडन रूग्णांच्या संबधितांशी संपर्क साधून नागरी ओरोग्य केंद्रातील विशेष लसीकरण पथक लसीकरणाचे नियोजन करेल. नागरिकांनी आपल्या कुटूंबातील बेडरिडन रूग्ण किंवा वयोवृध्दांची नोंदणी नजिकच्या नागरी आरोग्य केंद्रात करावी.


हेही वाचा – वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना दिलासा, ओबीसींना २७ टक्के, तर EWS कोट्यातील विद्यार्थ्यांना १० टक्के आरक्षण


 

First Published on: July 29, 2021 7:08 PM
Exit mobile version