दिवा- पनवेल रेल्वे सेवा सायंकाळी सुरु करण्याची मागणी

दिवा- पनवेल रेल्वे सेवा सायंकाळी सुरु करण्याची मागणी

पनवेल शहर आणि इतर परिसरातील नागरिक नोकरीच्या निमित्ताने रेल्वेचा प्रवास करीत असतात. दिवा-पनवेल मार्गावरील रेल्वे सेवा सुरु केली असली तरी, या रेल्वेची वेळ फक्त सकाळचीच आहे. या सकाळच्या रेल्वेने बऱ्याच संख्येने कर्मचारी कामावर जात असतात,मात्र परत येताना रेल्वे सेवा सायंकाळी नसल्याने कर्मचारी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय पाहायला मिळत आहे. त्यामुळे दिवा-पनवेल मार्गावरील सायंकाळची रेल्वे सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी येथील रेल्वे स्टेशन व्यवस्थापन अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.

ज्या नागरिकांचे दोन डोस पूर्ण झालेले आहेत अशाच नागरिकांना रेल्वे प्रवास करण्यासाठी मुभा देण्यात आलेली आहे. कोरोनाच्या दोन डोस दरम्यान ८६ दिवसांचे अंतर असून, ज्या नागरिकांचा एक डोस पूर्ण केलेला आहे अशांची गैरसोय होऊ नये याकरिता त्यांनाही प्रवासाची मुभा देणे आवश्यक आहे. त्यामुळे पनवेल-दिवा या मार्गावर सायंकाळची रेल्वे सेवा सुरू करण्यात यावी. तसेच ज्यांचा एक डोस पूर्ण केलेला आहे, अशा नागरिकांना रेल्वे प्रवासाची मुभा द्यावी, असे भोईर यांनी निवेदनात नमूद केले आहे. याबाबत रेल्वे मुख्यालयाकडून परवानगी दिल्यानंतर पनवेल-वसई गाडी सुरू करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.


हे ही वाचा – Temple Reopen : राज्यात १०५ दिवसांनी मंदिरे खुली, नवरात्रौत्सवासाठी मंदिरांमध्ये जय्यत तयारी


 

First Published on: October 7, 2021 4:31 PM
Exit mobile version