Dhanteras 2021: सोनं खरेदी करताना करा असा भाव, बिल आवश्य पाहा

Dhanteras 2021: सोनं खरेदी करताना करा असा भाव, बिल आवश्य पाहा

Dhanteras 2021: सोनं खरेदी करताना करा असा भाव, बिल आवश्य पाहा

उद्या, मंगळवारी धनत्रयोदशी (Dhanteras 2021) आहे. भारतातील लोकं या शुभ मुहूर्तावर धातू खरेदी करतात. विशेष म्हणजे धनत्रयोदशी आणि दिवाळी निमित्ताने सोनं-चांदी खरेदी करण्याची परंपरा आहे. जर तुम्ही सुद्धा धनत्रयोदशीच्या दिवशी स्वस्त आणि शुद्ध सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा.

जर तुम्ही सोनं खरेदी करताना काही गोष्टींवर लक्ष ठेवले तर योग्य दरात तुम्ही शुद्ध सोनं खरेदी करू शकाल आणि ज्वेलर्स तुमची दिशाभूल करू शकणार नाहीत. खासकरून महिला सणादिवशी ज्वेलरी खरेदी करतात. कारण सणादिवशी सोन्यात गुंतवणूक करणे हे चांगले मानले जाते किंवा सोन्याच्या रुपात लक्ष्मी घरात आली असं म्हणतात.

करनावळबद्दल भाव करा

दागिने बनवण्याचे देखील पैसे घेतात, त्यालाच करनावळ असं म्हणतात. या करनावळचे पैसे देताना व्यवस्थितीत भाव करा. काही ज्वेलर्स भाव केल्यानंतर करनावळ कमी करतात. कारण ज्वेलरीवर ३५ टक्के मेकिंग चार्ज जोडले जाते. ज्वेलर्सना सर्वात जास्त फायदा करनावळमधूनच मिळतो. त्यामुळे करनावळ कमी करण्याची नेहमी मागणी करा.

सोनं खरेदी केल्यानंतर त्याचे पैसे देण्यापूर्वी बिल व्यवस्थित पाहा, त्यामध्ये कोण-कोणते चार्ज लावले आहेत ते पाहा. अनेकदा ज्वेलर्स ग्राहकांची दिशाभूल करण्यासाठी बिलात वेगवेगळे पैसे लावतात आणि माहिती नसल्यामुळे ग्राहक काहीही बोलू शकत नाहीत.

केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, ग्राहकांना दागिने खरेदी करताना तीन गोष्टीचे पैसे द्यावे लागला. १. दागिन्यांच्या वजनानुसार किंमत, २. करनावळ आणि ३ जीएसटी या तीनच गोष्टीचे पैसे द्यावे लागतात. दागिन्याचे पैसे ऑनलाईन पद्धतीने द्या किंवा ऑफलाईन पद्धतीने, यावर फक्त ३ टक्के जीएसटी भरावा लागतो.

जर या तीन गोष्टींव्यतिरिक्त ज्वेलर्स कोणत्याही गोष्टीचे पैसे घेत असेल तर तुम्ही त्याला प्रश्न विचारू शकता. कारण काही ज्वेलर्स पॉलिश वेट आणि लेबर चार्जच्या नावाखाली पैसे घेतात, जे नियमांविरोधात आहे. तुम्ही असे पैसे देऊ नका आणि ज्वेलर्सविरोधात तक्रार करू शकता.

First Published on: November 1, 2021 8:21 PM
Exit mobile version