रायगडमध्ये प्रवासासाठी ‘ई-पास’ अनिर्वाय

रायगडमध्ये प्रवासासाठी ‘ई-पास’ अनिर्वाय

जिल्हाधिकाऱ्यांच्या मनधरणीनंतर पालकमंत्री तटकरेंचा बहिष्कार मागे

गणेशत्सवासाठी रायगड जिल्ह्यात येणार्‍या गणेशभक्तांना १० दिवस क्वारंटाईन राहावे लागणार असून १२ ऑगस्ट नंतर येणार्‍यांना स्वॅब टेस्ट करून यावे लागेल. तसेच जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी ई-पास आवश्यक असल्याची माहिती रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी जिल्हास्तरीय शांतता समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेनंतर जिल्हाधिकरी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत तटकरे बोलत होत्या. जिल्हाधिकरी निधी चौधरी, निवासी उपजिल्हाधिकरी डॉ. पद्मश्री बैनाडे यावेळी उपस्थित होत्या.

राज्यात जे नियम आहेत तेच रायगड जिल्ह्यात लागू

संपूर्ण राज्यात जे नियम आहेत तेच रायगड जिल्ह्यात देखील लागू आहेत. त्यामुळे राज्य सरकारचे नियम पाळले जातील. १२ ऑगस्टपर्यंत येणार्‍यांसाठी १० दिवसांचे क्वारंटाईन आहे. १२ ऑगस्टनंतर येणार्‍यांनी स्वॅब टेस्ट करूनच यावे. ही स्वॅब टेस्ट महागडी आहे. ती सर्वसामान्यांना परवडणारी नाही. त्यामुळे अँटिजन टेस्ट किंवा अ‍ॅण्टीबॉडी टेस्ट करणार्‍यांनादेखील जिल्ह्यात येण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंतही राज्य शासनाला करणार आहोत. जिल्हापातळीवर काही शिथिलता देता येईल का? यावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती तटकरे यांनी दिली.

ज्यांच्या गावाकडील घरांमध्ये कुणी राहत नाहीत अशांना घरी जाता यावे, यासाठी राज्य सरकारने या सावलती दिल्या आहेत. ज्यांच्या गावाकडील घरात लोक राहतात त्यांनी यंदा शक्यतो गणेशोत्सवासाठी गावी येण्याचे टाळावे. राज्य शासनाच्या नियामांचे पालन करून सहकार्य करावे. – आदिती तटकरे, पालकमंत्री, रायगड


हेही वाचा – Corona: पुण्यातील दगडूशेठ गणपती ट्रस्टचा मोठा निर्णय


First Published on: August 10, 2020 7:29 PM
Exit mobile version