नात्याला काळिमा, नराधम बाप ३ वर्षांपासून पोटच्या मुलीवर करत होता लैंगिक अत्याचार

नात्याला काळिमा, नराधम बाप ३ वर्षांपासून पोटच्या मुलीवर करत होता लैंगिक अत्याचार

नात्याला काळिमा, नराधम बाप ३ वर्षांपासून पोटच्या मुलीवर करत होता लैंगिक अत्याचार

एक नराधम बाप ३ वर्षांपासून आपल्या पोटच्या मुलीवर बलात्कार करत असल्याची संतापजनक घटना घडल्याचे समोर आले आहे. मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. याप्रकरणी सोमवारी पीडितेच्या तक्रारीनंतर आरोपी नराधम बापाला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

नक्की काय घडले?

एका ४५ वर्षीय व्यक्ती आपल्या १९ वर्षीय मुलीवर ३ वर्ष बलात्कार करत असल्याचे समोर आले. जेव्हा पित्याने पहिल्यांदा मुलीवर बलात्कार केला तेव्हा ती अल्पवयीन होती. घरात कोणी नसल्याचे पाहून पित्याने मुलीवर बलात्कार केला होता. त्यावेळेस नराधम बापाने मुलीला भावाला मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर मुलीवर आरोपी पिता सतत बलात्कार करू लागला. सोमवारी त्याने पुन्हा मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आणि आई व भावाला घराबाहेर काढण्याची धमकी देऊ लागला. शेवटी पीडित मुलीने छळाला कंटाळून आपल्या आई आणि दोन अन्य लोकांना याबाबत सांगितले. त्यानंतर मग थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. भोपाळ ऐशबाग पोलीस ठाण्यात पीडित मुलीने नराधम बापाविरोधात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी आरोपी बापावर POCSO आणि भारतीय दंड संहित कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.


हेही वाचा – सुहागरातमध्ये असे काही घडले की, नवरा-बायको रुग्णालयात झाले दाखल


 

First Published on: June 23, 2021 2:58 PM
Exit mobile version