वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाड्याच्या नरक यातना सुरूच

वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाड्याच्या नरक यातना सुरूच

वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाड्याच्या नरक यातना सुरूच

उरण तालुक्यातील जेएनपीटीचा विस्थापित हनुमान कोळीवाडा अद्यापही अनेक समस्यांनी ग्रासला असून, तुंबलेली गटारे आणि त्यातून आलेल्या जलवाहिनीमुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.हनुमान कोळीवाडा प्रकल्पग्रस्त नागरिकांनी आपल्या जमिनी, गाव जेएनपीटीचा विकासासाठी संपादित करू दिला. त्या बदल्यात जेएनपीटीने त्यांचे पुनर्वसन, नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत उरण-मोरा रस्त्यालगत खाडी भागात ३० वर्षांपूर्वी पुनर्वसन केले. मात्र पुनर्वसन केलेल्या हनुमान कोळीवाडा गावाचा भराव डेब्रिजने केला असल्यामुळे संपूर्ण गावाला वाळवीने पोखरले आहे. तेव्हापासून अनेक समस्यांचा सामना रहिवाशांना करावा लागत आहे.

गावात गटारे तुंबण्याची समस्या निर्माण झाली आहे. गटारे उघडी असून, तुंबली आहेत. त्यामुळे मच्छर निर्माण होऊन रोगराई पसरण्याचा धोका आहे. विशेष म्हणजे या गटारातूनच जलवाहिनी गेली असल्याने ठिकठिकाणी जोडण्यांवर लागलेल्या गळतीमधून गटाराचे पाणी जलवाहिनीमध्ये जात आहे. जेएनपीटी प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे या गावातील नागरिक नरकयातना भोगत आहेत.या सर्व पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत मात्र या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.

ग्रामपंचायतीला गटारे सफाई करण्यासाठी जो निधी लागतो तो मिळत नाही. तरीही जे शक्य असेल ते केले जाते. जेएनपीटीने जेवढे करायला पाहिजे ते त्यांच्याकडून केले जात नाही, असे हनुमान कोळीवाडा गावचे सरपंच परमानंद कोळी यांनी सांगितले

गावातील गटारे तुंबली आहेत. त्यामुळे रोगराई पसरू शकते ही बाब एकदम बरोबर आहे. ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करीत आहे. तसेच गटारांवर अतिक्रमणही झाले आहे. ग्रामपंचायतीने जेएनपीटीकडे पाठपुरावा करावा, असे हनुमान कोळीवाडा माजी सरपंच गौरव कोळी यांचे म्हणणे आहे.


हेही वाचा – …त्यानंतरच मी ईडीच्या समोर जाणार, अखेर अनिल देशमुखांनी सोडलं मौन


 

First Published on: August 19, 2021 5:35 PM
Exit mobile version