घरमहाराष्ट्र...त्यानंतरच मी ईडीच्या समोर जाणार, अखेर अनिल देशमुखांनी सोडलं मौन

…त्यानंतरच मी ईडीच्या समोर जाणार, अखेर अनिल देशमुखांनी सोडलं मौन

Subscribe

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने (ED) आतापर्यंत पाच वेळा समन्स बजावलं आहे. मात्र, एकदाही अनिल देशमुख चौकशीसाठी ईडीसमोर हजर झालेले नाहीत. अनिल देशमुख चौकशीसाठी का हजर होत नाहीत? याविषयी चर्चा सुरु असताना आता अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. न्यायालयीन चौकशी पूर्ण झाल्याशिवाय मी चौकशीला जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका अनिल देशमुख यांनी मांडली आहे.

अनिल देशमुख यांनी एक प्रसिद्धी पत्रक जारी केलं आहे. यामध्ये त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. “माझी ED च्या बाबतीतली याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्विकृत केली आहे. सर्वोच्च न्यायालय ही याचिका लवकरच ऐकूण घेणार आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने मला खालच्या न्यायालयामध्ये जाण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे आता ही न्यायालयीन प्रक्रिया सुरु आहे. ही न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मी स्वत: ED च्या समोर जाणार आहे व त्यांना संपूर्ण सहकार्य करणार आहे. माझ्या संपूर्ण राजकीय-सामाजिक जीवनात मी सदैव उच्च आदर्शांचे पालन केलं आहे,” असं देशमुख यांनी त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

- Advertisement -

ईडीचे देशमुखांना आतापर्यंत पाच समन्स

अनिल देशमुख यांना ईडीने आतापर्यंत पाचवेळा समन्स बजावले आहेत. त्यात पहिलं समन्स २५ जून रोजी देऊन २६ जून रोजी ईडी कार्यालयात हजर राहण्यासाठी सांगण्यात आलं होतं. दुसरं समन्स तात्काळ २६ जून रोजी देऊन आठवड्याभरात म्हणजे ३ जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, देशमुख चौकशीला हजर न राहिल्याने तिसरं समन्स बजावल्यानंतर ५ जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश दिले होते. यावेळी देखील देशमुख चौकशीला हजर राहिले नाहीत. त्यानंतर चौथं समन्स ३० जुलै रोजी पाठवून २ ऑगस्ट रोजी हजर राहण्याबाबत सांगण्यात आलं होतं. त्यानंतर १६ ऑगस्टला पाचवं समन्स बजावण्यात आलं होतं. १६ ऑगस्ट रोजी समन्स पाठवून त्यांना १८ ऑगस्टला हजर राहण्यासाठी सांगितलं गेलं होतं. मात्र, देशमुख कालही चौकशीसाठी गेले नाहीत. त्यांनी त्यांचे वकील इंदरपाल सिंग यांना निवेदन घेऊन पाठवलं होतं.


हेही वाचा – अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या; सीबीआयनं दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यास SC चा नकार

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -