Karjat : तलाठी संघाचे कर्जत, महाड तहसीलसमोर धरणे आंदोलन ; १३ ऑक्टोबरला कामावर बहिष्कार टाकणार

Karjat : तलाठी संघाचे कर्जत, महाड तहसीलसमोर धरणे आंदोलन ; १३ ऑक्टोबरला कामावर बहिष्कार टाकणार

तलाठी संघाचे कर्जत, महाड तहसीलसमोर धरणे आंदोलन ; १३ ऑक्टोबरला कामावर बहिष्कार टाकणार

ई-महाभूमी प्रकल्प राज्य समन्वय अधिकारी रामदास जगताप यांनी तलाठ्यांबाबत असंविधानिक शब्द वापरून अपमान केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी, या मागणीसाठी सोमवारी ११ ऑक्टोबरला तालुका तलाठी संघाच्या सदस्यांनी कर्जत आणि महाड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन पुकारले होते. राज्यात अतिवृष्टीने धुमाकूळ घातला असून, मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे. शेतीच्या नुकसानीचे काम तलाठी करीत आहेत. तलाठी, मंडळ अधिकारी संवर्ग शासन प्राधान्य क्रमाने सांगितलेले ई पीक पाहणी आणि मोफत सात-बारा वाटपाचे काम करीत आहे. तसा संदेश सोशल मीडियावर महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या अध्यक्षांनी तलाठी बांधवाना दिला होता. यावर प्रतिक्रिया देताना जगताप यांनी तलाठ्यांबाबत असंविधानिक शब्द वापरला. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी तालुका तलाठी संघाने केली आहे. तसे निवेदन तहसीलदार विक्रम देशमुख यांना देण्यात आले. या वक्तव्याचा निषेध म्हणून १३ ऑक्टोबर रोजी सर्व कामांवर बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदना म्हटले आहे.

दरम्यान, तलाठ्यांच्या विरोधात केलेल्या अवमानकारक वक्तव्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे.महाड येथे तलाठी संघटनेने धरणे आंदोलन करीत निषेध नोंदविला. ई चावडी, ई पीक पहाणी, ई फेरफारचे राज्य समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी तलाठी संघटनेच्या बाबतीत अवमानकारक वक्तव्य केल्यानंतर राज्य तलाठी संघटनेच्या सूचनेनुसार तालुका तलाठी संघटनेने तहसील कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन केले. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन दिले.


हे ही वाचा – college reopen : ऐकावं ते नवल, अजितदादांनी उघडलेले कॉलेज उदय सामंत करणार बंद?


 

First Published on: October 12, 2021 4:30 PM
Exit mobile version