पिनेवालेको बहाना चाहिए ; संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला प्रांत कार्यालयात रंगली दारू पार्टी

पिनेवालेको बहाना चाहिए ; संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला प्रांत कार्यालयात रंगली दारू पार्टी

पिनेवालेको बहाना चाहिए ; संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला प्रांत कार्यालयात रंगली दारू पार्टी

संविधाना दिनाच्या पूर्वसंध्येला येथील प्रांत कार्यालयामध्ये काही कर्मचार्‍यांची रंगलेली दारू पार्टी शिवराज्य ब्रिगेडचे सरचिटणीस नीलेश पाटील यांच्यामुळे उघडकीस आली आणि या कर्मचार्‍यांची चांगलीच भंबेरी उडाली.गुरुवारी सायंकाळी ५ कर्मचारी या ठिकाणी दारू ढोसत बसले होते. पाटील हे काही कामानिमित्त तेथे गेले असता एका दालनाचा दरवाजा बंद असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांना संशय आला. त्यांनी दरवाजा उघडून पाहिले तर आत दारूची पार्टी रंगात आली होती. कामकाजाच्या टेबलवरच दारूच्या बाटल्या आणि आणि चखण्याचे पदार्थ ठेवण्यात आले होते. याबाबत जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करण्यात आली आहे. संबंधित कर्मचार्‍यांवर कारवाई केली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. सध्या या दारू पार्टीची खमंग चर्चा सर्वत्र सुरू आहे. दरम्यान, असा प्रकार घडला असल्यास याबाबची चौकशी करून संबधित कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती प्रांत प्रशांत ढगे यांनी दिली.


हे ही वाचा – MLC election: आमच ठरल्यानुसार घडलंय ! अमल महाडिकांचा अर्ज मागे, सतेज पाटलांचा मार्ग मोकळा


 

First Published on: November 26, 2021 7:47 PM
Exit mobile version