Live Update : मुंबईत गेल्या २४ तासांत आढळले ४८३ नवे रुग्ण, ८ जणांचा मृत्यू

Live Update : मुंबईत गेल्या २४ तासांत आढळले ४८३ नवे रुग्ण, ८ जणांचा मृत्यू
मुंबईत मागील २४ तासांत ४८३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख ८ हजार ९६९ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ११ हजार ३५१ जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात २४४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत २ लाख ९० हजार ९१३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत ५ हजार ७९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
उद्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस असणार आहे. या दुसऱ्या दिवसाच्या अधिवेशनात कोरोना लसीकरण मोफत करण्याची घोषणा करण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
गेल्या २४ तासांत राज्यात २ हजार ५८५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढ झाली असून ४० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २० लाख २६ हजार ३९९वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५१ हजार ८२ जणांचा मृत्यू झाला असून १९ लाख २९ हजार ५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
महाराष्ट्र उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आज संध्याकाळी ५ वाजता राज्यपालांची भेट घेणार आहेत. महाविद्यालये सुरु करण्यासंदर्भात आज चर्चा होणार आहे. बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
क्रिकेटर सौरव गांगुली यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर दुसऱ्यांदा अन्जोप्लॉस्टीनंतर सौरभ गांगुली यांना घरी सोडण्यात आले आहे.
गझलकार इलाही जमादार यांचे निधन झाले आहे. सांगलीतील दूधगावात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक दिवसांपासून ते आजाराने ग्रस्त होते.
आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेच्या भायखळा ते माटुंगा अप व डाउन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. तर हार्बर मार्गावर कुर्ला -वाशी अप व डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० दरम्यान मेगाब्लॉक असणार आहे.पश्चिम रेल्वे मार्गांवरील रेल्वे रुळ दुरस्तीसाठी आणि ओव्हरहेड वॉयरच्या देखभालीसाठी रविवारी बोरीवली ते गोरेगाव रेल्वे स्थानकांच्या दरम्यान अप डाउन धीम्या मार्गांवर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
First Published on: January 31, 2021 8:55 PM
Exit mobile version