रॉट व्हिलर कुत्र्याच्या हल्ल्यात कामगाराचा मृत्यू

रॉट व्हिलर कुत्र्याच्या हल्ल्यात कामगाराचा मृत्यू

रॉट व्हिलर कुत्र्याच्या हल्ल्यात कामगाराचा मृत्यू

रॉट व्हिलर जातीच्या पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात एका ५५ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना रत्नागिरीत घडली आहे. यामध्ये दिवाकर पाटील या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. खायला अन्न देण्यासाठी गेले असताना रॉट व्हिलर या कुत्र्याने दिवाकर यांच्यावर हल्ला केला. हल्ल्या दरम्यान, कुत्रा एवढा चवताळलेला होता की, त्याला बेशुद्ध करुन दिवाकर यांची सुटका करण्यात आली. यामध्ये दिवाकर गंभीर जखमी झाले. पण, दुर्दैवाने त्यांचा यामध्ये मृत्यू झाला.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार; रत्नागिरी शहरात माजी उपनगराध्यक्ष बाळ मयेकर यांनी रॉट व्हिलर जातीचा कुत्रा पाळला आहे. त्या कुत्र्याला जेवण देण्यासाठी दिवाकर पाटील गेले. मात्र, कुत्रा आधीच चवताळलेला होता. त्यामुळे दिवाकर गेले आणि कुत्र्याने त्यांच्यावर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात दिवाकर गंभीर जखमी झाले. त्यांनी मदतीसाठी हाक मारली मात्र, कुत्रा खूपच चवताळला होता. त्यामुळे दिवाकरांना त्यांच्या तावडीतून सोडण्यासाठी डॉक्टर आणि वनविभाच्या अधिकाऱ्यांना बोलवावे लागले. त्यानंतर कुत्र्याला डॉक्टरांनी बेशुद्ध केले. कुत्रा बेशुद्ध झाल्यानंतर दिवाकर यांची सुटका करण्यात आली. मात्र, कुत्र्याचा हल्ला इतका भीषण होता की, या हल्ल्यात दिवाकरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची शहर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.


हेही वाचा – पत्नीने दारु का पिता म्हणून हटकलं; पतीने डोक्यात कुऱ्हाड घालून संपवलं


First Published on: November 12, 2020 6:35 PM
Exit mobile version