नवी मुंबई विमानतळाला दिबांचेच नाव हवे -आशिष शेलार 

 नवी मुंबई विमानतळाला दिबांचेच नाव हवे -आशिष शेलार 

 नवी मुंबई विमानतळाला दिबांचेच नाव हवे -आशिष शेलार 

गरीबांसाठी ज्यांनी संघर्ष केला, भूमिपुत्रांना न्याय मिळवून दिला अशा थोर संघर्षमूर्ती दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यास महाराष्ट्र सरकार का विरोध करत आहे, हे ठाकरे सरकारने जाहीर करावे, असे आव्हान भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारला येथे दिले. ओवळे विभागातील शेकापचे कार्यकर्ते आणि २७ गाव समितीचे कार्याध्यक्ष सुनिल म्हात्रे यांच्यासह कार्यकर्त्यांना भाजपत प्रवेश देण्याच्या कार्यक्रमात शेलार बोलत होते.भूमिपुत्रांच्या हक्कासाठी ज्यांनी आपले जीवन वेचले.

अखेरच्या श्वासापर्यंत संघर्ष केला त्या दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला लागलेच पाहिजे, असे सांगतानाच यासाठी उभारण्यात आलेल्या लढ्याचे अशिष शेलार यांनी कौतुक केले. हा मतांचा संघर्ष नाही तर भूमिपुत्रांच्या अस्मितेसाठी संघर्ष असून दिबांचे नाव विमानतळाला लागलेच पाहिजे आणि त्यासाठी तसूभर मागे हटणार नाही, असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला. सिडकोचे अध्यक्ष असताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी येथील समस्या, नागरिकांचे प्रश्न, भूमिपुत्रांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. कुठल्याही दलालाला तिथे थारा नव्हता. पण आता विमानतळाचे काम सुरु असताना या कामाचे टेंडर मुंबईतील निर्मल इमारतीत ठरते आणि दलाली ठरल्यानंतर वैभव चेंबरमध्ये कन्फर्मेशन ऑर्डर निघते असा आरोप त्यांनी केला.


हे ही वाचा – Live Update: तालिबानने काबुलमध्ये टोलो न्यूजच्या पत्रकाराला केली मारहाण


 

First Published on: August 26, 2021 12:39 PM
Exit mobile version