घरताज्या घडामोडीLive Update: काबुल विमानतळावर गोळीबार १३ जणांचा मृत्यू

Live Update: काबुल विमानतळावर गोळीबार १३ जणांचा मृत्यू

Subscribe

काबुल विमानतळावर गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. या स्फोटात लहान मुलांसह १३ जणांचा मृत्यू झाला आहे. काबुल विमानतळावर झालेला हा स्फोट आत्मघातकी स्फोट असल्याचे म्हटले जात आहे. हल्ल्यावेळी हजारो नागरिक विमानतळावर उपस्थित होते,अशी माहिती मिळत आहे.

- Advertisement -

 

मुंबईत आज गुरुवारी २९७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५०७ जण कोरोनामुक्त होऊन सुखरुप घरी परतले आहेत.

- Advertisement -


राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या हस्ते आज माजी संरक्षण मंत्री व गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या जीवनावर आधारित ‘एक मनोहर कथा’ पुस्तकाचे प्रकाशन राजभवनावर करण्यात आले. यावेळी विरोध पक्ष नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.


राज्यपाल आणि मविआच्या नेत्यांमध्ये १ सप्टेंबरला भेट होणार आहे. शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर राज्यपालांनी १ सप्टेंबर ही वेळ दिली आहे. मविआचे नेते आणि राज्यपालांची आज भेट होणार मात्र ती  रद्द करण्यात आली.


ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. उद्या सकाळी ११ वाजता सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक होणार आहे.


काबुल विमानतळावर गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. या स्फोटात काही जणांचा मृत्यू झाला आहे. काबुल विमानतळावर झालेला हा स्फोट आत्मघातकी स्फोट असल्याचे म्हटले जात आहे. हल्ल्यावेळी हजारो नागरिक विमानतळावर उपस्थित होते,अशी माहिती मिळत आहे.


मुंबई महापालिकेने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली आहे. मुंबईतील विविध रुग्णालयात फक्त ५०० रुग्ण खाटांवर उपचार घेत आहेत. तर उर्वरित २९ हजार ५०० खाटा रिक्त आहेत. तसेच, कोरोना बाधित २,२५५ सक्रिय रुग्ण घरीच क्वारंटाईन होऊन उपचार घेत आहेत. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही बाब काहीशी दिलासादायक आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसच्या नेत्यांसह १२ आमदारांच्या प्रश्नांवर भेट घेण्यासाठी जाणार होते. मात्र राज्यपालांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट नाकारली आहे. असे असले तरी शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर हे राज्यपालांच्या भेटीला गेले आहेत.


राष्ट्रपतींना मराठा आरक्षणाविषयी समाजाच्या भावना समजाव्यात यासाठी भेट मागितली होती. त्यानुसार त्यांनी दि २ सप्टेंबर रोजी भेटीसाठी वेळ दिली आहे. यावेळी सर्व पक्षीय प्रत्येकी १ खासदार प्रतिनिधींने उपस्थित रहावे, यासाठी आज सर्व पक्षाचे अध्यक्ष व गटनेत्यांना पत्र पाठवली आहेत.


मुख्यमंत्री राज्यपालांच्या भेटीसाठी रवाना


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज भेट होणार मात्र ही भेट रद्द करण्यात आली आहे. १२ आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात या भेटीत चर्चा होणार होती असे सांगण्यात येत आहे.


टेस्टिंग वाढवल्यामुळे कोरोना रुग्णसंख्येत वाढ – राजेश टोपे


ठाकरे सरकारच्या राज्यातील अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अधिकाऱ्यांच्या सेवेत असताना मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्यांना नोकरी मिळणार असल्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.


कोव्हिशिल्डच्या २ डोसमधील अंतर कमी करणार करण्यासाठी नीती आयोगामध्ये चर्चा होणार. सध्या कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर ९० दिवसांचे आहे. ते कमी करण्यासाठी नीती आयोगामध्ये चर्चा होणार आहे.


आग्रीपाडा येथील सेंट जोसेफ आश्रमातील २२ मुलं कोरोनाबाधित आढळल्याचे समोर आले आहे. यापैकी १२ वर्षाखालील १८ मुलं आहेत, ज्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.


राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली आहे. राज्यातील कोरोना परिस्थितीवर चर्चा केली जाणार आहे.


पीओपीच्या मूर्ती वस्तू म्हणून विकता येणार पण विसर्जन करता येणार नाही, असा निर्णय गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने निर्णय घेतला आहे. पीओपी मूर्तींवरची बंदी कायम आहे. तसेच पीओपी मूर्तींच्या विसर्जनावरही बंदी घालण्यात आली आहे.


रुटीन चेकअपसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. उद्यापासून त्यांची पुन्हा जनआशीर्वाद यात्रा सुरू होणार आहे.


तालिबानने काबुलमध्ये मारहाण केली. माझ्या हत्येची बातमी चुकीची पसरवली जात आहे, असे टोलो न्यूजचे पत्रकार जिहार खानने याद स्पष्ट केले आहे.


तालिबानने टोलो न्यूजच्या पत्रकाराची काबुलमध्ये केली हत्या, अशी माहिती टोलो न्यूजने दिली आहे.


देशात गेल्या २४ तासांत ४६ हजार १६४ नव्या कोरोनाबाधित वाढ झाली असून ३४ हजार १५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ६०७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ कोटी २५ लाख ५८ हजार ५३०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४ लाख ३६ हजार ३६५ रुग्णांचा मृत्यू झाला असून ३ कोटी १७ लाख ८८ हजार ४४० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात ३ लाख ३३ हजार ७२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. जवळपास आठ महिने उलटूनही या १२ आमदारांच्या यादीबद्दल कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे रखडलेल्या १२ आमदारांच्या यादीवर राज्यपालांशी चर्चा करण्याची शक्यता आहे.


राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक होणार आहे. दुपारी ३.३० वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडणार आहे. राज्यातील घडामोडींवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.


आगामी महापालिका निवडणुका संदर्भात निवडणूक आयोगाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. प्रभाग रचनेचा प्रारुप कच्चा आराखडा तयार करण्याचे महापालिकांना निर्देश देण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -