भाजपचे दोन नगरसेवक शिवसेनेत; गणेश नाईक यांना जोरदार धक्का!

भाजपचे दोन नगरसेवक शिवसेनेत; गणेश नाईक यांना जोरदार धक्का!

भाजपचे दोन नगरसेवक शिवसेनेत; गणेश नाईक यांना जोरदार धक्का!

नवी मुंबईतील भाजपच्या नगरसेविका अपर्णा गवते आणि दिपा गवते यांनी मंगळवारी शिवसेनेत प्रवेश केला. वर्षा निवासस्थानी झालेल्या प्रवेश सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले. नगरविकासमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते. अपर्णा गवते या स्थायी समिती सभापती नवीन गवते यांच्या पत्नी आहेत. त्यांच्या शिवसेनाप्रवेशामुळे दिघ्यातून भाजपचा सुपडासाफ झाला असून गणेश नाईक यांना जोरदार धक्का बसला आहे.

भाजपमधून जोरदार आऊटगोईंग

गणेश नाईक यांच्या मनमानी कारभारामुळे नवी मुंबईतील भाजपमधून जोरदार आऊटगोर्इंग सुरू आहे. सुरेश कुलकर्णी, राधा कुलकर्णी, संगीता वासके, मुद्रिका गवळी, चंद्रकांत आगोंडे यांच्या पाठोपाठ दिघ्यातील भाजपच्या नगरसेविका अपर्णा गवते आणि दिपा गवते यांच्यासह राजेश गवते आणि चंद्राम सोनकांबळे यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी भगवा हाती घेतला. याप्रसंगी परिवहन मंत्री अनिल परब, खासदार राजन विचारे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना नगरसेवक एम. के. मढवी, करण मढवी आदी उपस्थित होते. दिघ्यातील पाचपैकी तीन प्रभागांवर गवते कुटुंबाची पकड आहे. उरलेल्या दोन प्रभागात शिवसेनेचे नगरसेवक आहेत. गवते कुटुंबाने शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे दिघ्यातून भाजप हद्दपार झाली असून शिवसेनेची ताकद प्रचंड वाढली आहे.


हेही वाचा – वाशी खाडी पुलावर धावत्या लोकलमधून ‘ति’चा आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांच्या तपासात उघड


 

First Published on: December 29, 2020 10:07 PM
Exit mobile version