नाशिकमध्ये पुन्हा संचारबंदी, विनामास्क नागरिकांना १ हजार रुपयांचा दंड

नाशिकमध्ये पुन्हा संचारबंदी, विनामास्क नागरिकांना १ हजार रुपयांचा दंड

मुंबई-पुण्यापाठोपाठ नाशिकमध्येही कोरोना संसर्ग वाढू लागल्याने, शहरासह जिल्ह्यात पुन्हा एकदा रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळांनी दिली. पालकमंत्री छगन भुजबळांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला. रात्री ११ ते पहाटे ५ वाजेदरम्यान शहरात संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याशिवाय, विनामास्क नागरिकांना १ हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे. दरम्यान, गोरज मुहूर्तावर होणाऱ्या लग्नसोहळ्यांवरदेखील बंदी घालण्यात आली आहे.

First Published on: February 21, 2021 6:02 PM
Exit mobile version