दिव्यात वीज पडून वृद्धाचा मृत्यू

दिव्यात वीज पडून वृद्धाचा मृत्यू

दिव्यात वीज पडून वृद्धाचा मृत्यू

राज्यात मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी वीज कोसळण्याच्या घटना समोर आल्या आहेत. बुधवारी ०६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ८ वाजताच्या सुमारास गोपाळधाम इमारत जवळ, दिवा आगासन रोड, गणेशनगर, दिवा (पू.) याठिकाणी आकाशातून वीज पडल्याने तेथील रहिवासी प्रभाकर गोविंद अंबारे (६८) यांना गंभीर दुखापत झाली. स्थानिक रहिवाश्यांनी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे उपचाराकरिता दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले अशी माहिती ठाणे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

त्याचप्रमाणे शिरुर तालुक्यातही दोन महिलांवर वीज कोसळली. पाऊस येत असल्याने महिला एका लिंबाच्या झाडाखाली आश्रयाला थांबल्या. नेमकी त्या ठिकाणी वीज कोसळली आणि दोन्ही महिला जखमी झाल्या. छकुली अण्णासाहेब जरांगे ( १३ वर्ष ) आणि मनीषा रामेश्वर घाटे ( ३१ वर्ष ) अशी जखमी महिलांची नावे आहेत.

वडगाव माळवात बैल आणण्यासाठी गेलेल्या एका १४ वर्षाच्या मुलाच्या अंगावर वीज कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. राज भरत देशमुख असे त्या मुलाचे आहे. संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारात राज बैलपोळा निमित्ताने बैल आणण्यासाठी गेला आणि बाहेर मोठा आवाज आला. खांडी येथील एका रस्त्याच्या कडेला झाडाजवळ राज पडलेला सापडला. वीज अंगावरपडल्याने त्याचे केस जळाले होते. त्याचप्रमाणे त्याच्या नाकातून व कानातून रक्त येत होते. त्याला तात्काळ उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.


हेही वाचा – ठाण्यातील ‘हा’ रस्ता झाला धोकादायक; वाहतूक केली बंद

First Published on: October 7, 2021 8:30 AM
Exit mobile version