सर्वसामान्यांना दिलासा! डोंबिवलीत आज मिळणार १ रुपया प्रतिलिटरने पेट्र्रोल

सर्वसामान्यांना दिलासा!  डोंबिवलीत आज मिळणार १ रुपया प्रतिलिटरने पेट्र्रोल

Petrol Diesel Price Drop: भाजपशासित राज्यांत पेट्रोलचे दर १२ ते १५ रुपयांनी घसरले, महाराष्ट्राचं काय?

पर्यायवरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत कल्याण युवा सेना विधानसभा अधिकारी योगेश म्हात्रे आणि नगरसेविका पूजा म्हात्रे यांनी डोंबिवलीत १ रुपया पेट्रोल देत नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. डोंबिवलीत आज सकाळी १० ते १२ वाजताच्या दरम्यान १ रुपया प्रतिलिटर पेट्रोल विकले जाणार आहे. (Petrol will be sold at Rs 1 per liter in Dombivali today on the occasion of aditya thackeray birthday)  गेल्या अनेक महिन्यांपासून पेट्रोलच्या किंमतींनी शंभरी ओलांडली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसल्याचे पहायला मिळाले आहे. पेट्रोलच्या वाढत्या किंमतीवर अनेकांनी टीका केली मात्र सामान्यांच्या प्रश्नांकडे कोणीत लक्ष द्यायला तयार नसल्याचे दिसून आलेय. त्यामुळे सर्वसामान्यांना थोडाफार दिलासा देण्याचा प्रयत्न या उपक्रमातंर्गत करण्यात येणार आहे.

डोंबिवलीच्या MIDC येथील उस्मा पेट्रोल पंपावर एक रुपया प्रतिलिटर पेट्रोल विकले जाणार आहे. सकाळी १० ते १२ वाजताच्या दरम्यान येणाऱ्या ग्राहकांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अंबरनाथ येथे सुद्धा कमी दरात पेट्रोल देण्याची सुविधा केली आहे. अंबरनाथच्या विमको नाक्यावरील पेट्रोल पंपावर सकाळी ११ ते १ वाजतादरम्यान ५० रुपये प्रतिलिटरने पेट्रोल विकले जाणार आहे.

आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त का होईना डोंबिवलीकरांना १ रुपया प्रतिलिटरने पेट्रोल खरेदी करता येणार आहे. डोंबिवली आणि अंबरनाथ या ठिकाणी राबवलेल्या या योजनेमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.


हेही वाचा – मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणीसाठ्यात वाढ, ७ तलावांत ४८ दिवसांचा पाणी साठा

First Published on: June 13, 2021 9:02 AM
Exit mobile version