रायगडच्या घोणसे घाटात भीषण अपघात, प्रवासी बस दरीत कोसळली, 3 मृत्यू तर 20 जखमी

रायगडच्या घोणसे घाटात भीषण अपघात, प्रवासी बस दरीत कोसळली, 3 मृत्यू तर 20 जखमी

रायगडच्या घोणसे घाटात भीषण अपघात, प्रवासी बस दरीत कोसळली, 3 मृत्यू तर 20 जखमी

रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात असणाऱ्या घोनसे घाटात ठाणे ते श्रीवर्धन अशा प्रवास करणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. सदर बस 8 मे 2022 रोजी आठच्या सुमारास पन्नास ते साठ फूट खोल दरीत कोसळली आहे. या अपघातात 3 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर 20 जण जखमी झाले आहेत. जखमींवर म्हसळा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर काही अतिगंभीर असणाऱ्या जखमींना माणगाव येथील रुग्णालयात नेण्यात येत असल्याचे म्हसळा पोलीस ठाण्याचे प्रभारी उद्धव सुर्वे यांनी सांगितले आहे. सदर बसचा अपघात झाला असता मदतीसाठी घटनास्थळी प्रशासनाने धाव घेतली आहे.

नालासोपारा वरून एक खाजगी बस सुटली होती तिचा घोणसे घाटात अपघात झाला आहे, MH 04 FK 6616 असा या अपघात झालेल्या गाडीचा नंबर आहे. रायगडच्या घोणसे घाटात भीषण अपघात झाला आहे. एक बस पुलावरुन 60 ते 70 फूट खाली कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार ठाणे येथून काही जण श्रीवर्धन येथील गावी एका कार्यक्रमासाठी निघाले असताना बसचा अपघात झाला. म्हसळा तालुक्यातील धनगर मलई परिसरातील ठाण्याला राहणारे नागरिक आपल्या गावाला एका कार्यक्रमासाठी म्हसळा येथे येत असताना हा अपघात झाला. सध्या मदतकार्य सुरु आहे.

दरम्यान मृतांची ओळख पटवण्याबाबतचा तपास सुरु करण्यात आला आहे. तसेच स्थानिक प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे की, जर आपल्या पैकी कोणाचे नातेवाईक गावी निघाले असतील तर त्यांच्या जवळपास संपर्क करा.

पालकमंत्री आदिती तटकरेंकडून जखमींची विचारपूस

पालकमंत्री आदिती तटकरे यांनीही तातडीने अपघातग्रस्तांची भेट घेतली असून अपघातग्रस्तांना आवश्यक उपचार देण्याविषयी आरोग्य यंत्रणेला निर्देश दिले आहेत. रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात असणाऱ्या घोणसे घाटात ठाणे ते श्रीवर्धन अशा प्रवास करणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. दरम्यान मृतांची ओळख पटविण्याबाबतची कार्यवाही व तपास सुरु करण्यात आला आहे.


हेही वाचा : डोंबिवलीत दुर्देवी घटना, कपडे धुण्यासाठी गेलेल्या गायकवाड कुटुंबातील ५ जणांचा खदानीत बुडून मृत्यू

First Published on: May 8, 2022 11:59 AM
Exit mobile version