नियोजनशून्य कारभारामुळे रेवस पंचक्रोशीत पाणी टंचाई

नियोजनशून्य कारभारामुळे रेवस पंचक्रोशीत पाणी टंचाई

नियोजनशून्य कारभारामुळे रेवस पंचक्रोशीत पाणी टंचाई

रेवस पंचक्रोशीतील ग्रामपंचायती मध्ये निर्माण झालेली पाणी टंचाई चांगलीच गाजत आहे. झिराड ग्रामपंचायतीवर पर्यायाने आपल्यावर होणार्या आरोपाना उत्तर देताना, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण समिती सभापती दिलीप भोईर यांनी जिल्हापरिषदच्या नियोजित शून्य कारभारामूळे रेवस पंचक्रोशीतील गावांमध्ये पाणी टंचाई भेडसावत असल्याचे सांगून, त्या सर्व अनधिकृत नळ जोडणीवर तात्काळ कारवाई करा, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.रेवस, कोप्रोली, मिळखतखार, सारळ आणि डावली रांजणखार उर्फ नवखार या पाच ग्रामपंचायतच्या सरपंचानी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाण्यासाठी लाक्षणिक उपोषण केले होते. यावेळी समाजकल्याण समिती सभापती दिलीप भोईर यांच्यावर अनधिकृत नळ जोडणी दिल्याचा आरोप सोशल मिडीयावरुन झाला होता. त्यावर आपले म्हणणे मांडण्यासाठी दिलीप भोईर यांनी मंगळवारी आपल्या जिल्हापरिषद मधील दालनात पत्रकार परिषद बोलावली होती. त्यावेळी ते बोलत होते.

दिलीप भोईर यांनी पाण्यासाठी उपोषण करणार्या पाच ही ग्रामपंचायतच्या सरपंचाची भूमिका रास्त असल्याचे मान्य करीत. त्या गावांना पाणी मिळत नसल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले असल्याचे स्पष्ट केले करतानाच जिल्हापरिषद पाणी विभागाचा नियोजनशून्य कारभार ही तितकाच कारणीभूत असल्याचे दिलीप भोईर म्हणाले. झिराड मध्ये पाझर तलावाचा प्रकल्प राबविण्यात येत असल्याने तेथे २५ लाख लिटर क्षमता असलेल्या पाणी साठवण टाकीची मागणी केली आहे. त्यामुळे झिराडसह काही गावांचा पाणी प्रश्न मार्गी लागू शकतो. असे ते म्हणाले.

रेवस योजनेचा पाणी पुरवठा नेमका कशा प्रकारे होतो याची सविस्तर माहिती त्यांनी दिली. झिराड ग्रामपंचायत अनधिकृत पाणी जोडणीवर आक्षेप घेणार्यांनी केवळ राजकीय हेतूने आरोप केले आहेत, झिराडला लक्ष करून आपल्यावर चिखल फेक करण्यात येत आहे. केवळ झिराड नव्हे तर सर्व अनधिकृत पाणी जोडणीवर कारवाई व्हावी असे दिलीप भोईर म्हणाले.विहिरीत एमआयडीसी चे पाणी घेतले जाते. त्यावर टँकर चालतात, पाण्याचा धंदा होतो. ते आरोप करणार्यांना दिसत नाही, याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. अनधिकृत नळ जोडणी जरूर तोडावी,त्यात आम्ही आक्षेप घेणार नाही,पण ही कारवाई सर्व नळ जोडणीवर झाली पाहिजे असे ही दिलीप भोईर यांनी नमूद केले.


हेही वाचा – T20 World Cup : पाकची भारतीय संघाशी तुलना होऊच शकत नाही; गंभीरचा टोला 


 

First Published on: August 19, 2021 8:43 PM
Exit mobile version