रियाच्या तुरूंगातील पहिल्या दिवसाबद्दल नेटकऱ्यांमध्ये उत्सुकता!

रियाच्या तुरूंगातील पहिल्या दिवसाबद्दल नेटकऱ्यांमध्ये उत्सुकता!

रिया चक्रवर्ती

अभिनेत्री रिया चक्रवर्तीला एनसीबीने अटक केली आहे. ड्रग्ज सेवनासह इतर आरोपांखाली मंगळवारी तीला अटक झाली असून तिची रवानगी भायखळा तुरूंगात करण्यात आली आहे. मात्र तुरूगांत असूनही सगळीकडे रियाचीच चर्चा आहे. अगदी आता रियाचा पहिला दिवस तुरूंगात कसा गेला यावरही चर्चा रंगली आहे. रियाला नेमकं कुठे ठेवलय? तीला जेवणात तुरूंगात काय दिलं जात? असे अनेक प्रश्न सध्या नेटकऱ्यांना पडले आहेत.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच ड्रग्ज तस्करीचा मुद्दा समोर आला होता. यामध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला एनसीबीने अटक केली आहे. यामध्येच आता रियाला तुरुंगात पहिल्या दिवशी कोणतं जेवण देण्यात आलं हे ‘इंडिया टुडे’च्या वृत्तात सांगण्यात आलं आहे.

रियाला ठेवण्यात आलेल्या कारागृहात शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी देखील आहे. तसंच या तुरूंगात ६ बॅरेक असून प्रत्येक बॅरेकमध्ये ४० ते ५० आरोपी असतात. तेथेच रिया देखील रहात आहे.

तुरुंगात रियाला एक चादर, बेडशीट, उशी आणि चटई देण्यात आली आहे. तसंच गरजेच्या वस्तू ठेवण्यासाठी तिला एक मोठी पिशवीदेखील देण्यात आली आहे. तसंच रियाला तुरुंगात इतर कैद्यांप्रमाणेच जेवण देण्यात येत आहे. या जेवणामध्ये दोन पोळ्या( चपाती), एक वाटी भात, एक वाटी वरण( डाळ) आणि एक भाजी यांचा समावेश आहे. तुरुंगामध्ये कैद्यांसाठी उपहारगृहदेखील आहे. यामध्ये बिस्कीट्स किंवा अन्य खाद्यपदार्थ ठेवण्यात आले आहेत.

दिवसेंदिवस या प्रकरणात वेगवेगळे खुलासे होत आहे. सुशांतच्या आत्माहत्येचा तपास अद्याप सीबीआय करत आहे. आथा या आणखी काय समोर येणार? सुशांतला न्याय कधी मिळणार? या गोष्टीची वाट त्याचे चाहते बघत आहेत.


हे ही वाचा – बाळासाहेबांची विचारधारा सत्तेसाठी विकली, आणि ‘सोनिया’ सेना झाली – कंगना


First Published on: September 10, 2020 1:01 PM
Exit mobile version