‘कराची स्वीट्स’वरून शिवसेनेत मतभेद

‘कराची स्वीट्स’वरून शिवसेनेत मतभेद

शिवसेना नेते नितीन नांदगावकर आणि खासदार संजय राऊत

मुंबईतील वांद्रे भागात असलेल्या कराची स्वीट्सचे नाव बदला अशी मागणी नितीन नांदगावकर यांनी केली आहे. मात्र, शिवसेना नेते संजय राऊत यांनीच नितीन नांदगावकरांच्या भूमिकेला फाटा देत, अशा प्रकारची आता मागणी करण्यात काहीच तथ्य नसल्याचे सांगितले आहे. याचबरोबर ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही, असे देखील संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे कराची बेकरीचं नाव बदलण्याच्या मुद्यावरून आता शिवसेनेतच मतभिन्नता असल्याचं उघडपणे समोर आले आहे.

मुंबईत मागील ६० वर्षांपासून कराची बेकरी आणि कराची स्वीट्स आहे. त्यांचा पाकिस्तानशी काहीही संबंध नाही. आता त्याचं नाव बदलण्यास सांगण्यात काहीच तथ्य नाही. त्याचं नाव बदलण्याची मागणी ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही, असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, कराची पाकिस्तानातील आहे. त्यामुळे आपल्या लष्करी सैनिकांचा अपमान होतो. नितीन नांदगावकर यांनी म्हटलेले आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात कराची नावाने कोणतेही व्यवसाय चालणार नाहीत. यामुळे तुम्ही पाकिस्तानला एक प्रकारे पाठिंबा देत असल्याचे निदर्शनास येते. महाराष्ट्रात रहायचे असेल तर असे नाव चालणार नाही, असेही नितीन नांदगावकर यांनी म्हटले आहे.

मनसेचा कराची स्वीट्सच्या व्यवस्थापकांना कोर्टात खेचण्याचा इशारा –
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष हाजी सैफ शेख यांनी कराची स्वीट्स दुकानाच्या व्यवस्थापनाला पत्र पाठवलं आहे. देशातील पारंपारिक शत्रू पाकिस्तानातील कराची या नावाचा आधार घेत आपण बहुचर्चित आस्थापन सुरू केलं आहे. त्याचा प्रचार व विस्तार करून भारतीयांच्या भावनांना ठेच पोहोचवून व्यवसाय करत आहात. तसंच मराठी भाषेचाही द्वेष करत आहात त्याबाबत आक्षेप आहे, असं त्यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे. तसंच कराची स्वीट्सच्या व्यवस्थापकांना न्यायालयात खेचण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

First Published on: November 20, 2020 7:20 AM
Exit mobile version