‘या’मुळे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या सहलेखकाने केली आत्महत्या

‘या’मुळे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या सहलेखकाने केली आत्महत्या

तारक मेहता का उल्टा चष्माचे सहलेखक अभिषेक मकवाना

छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील सहलेखकाने २७ नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली होती. त्यांच्या राहत्या घरी अभिषेक मकवाना यांनी गळफास लावून आपले जीवन संपवले. पण, त्यांनी आत्महत्या का केली याचा शोध सुरु होता. त्यादरम्यान, एक माहिती समोर आली असून त्यांनी आत्महत्या आर्थिक कारणांमुळे केल्याचे सुसाईड नोटमध्ये म्हटले होते.

काय आहे नेमके प्रकरण?

गेल्या आठवड्यात ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील सहलेखक अभिषेक मकवाना यांचा गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्यांनी ही आत्महत्या आर्थिक ऑनलाईन कर्ज देणाऱ्या एका बनावट Application च्या छळवणुकीमुळे हे टोकाचे पाऊल उचले असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा शोध सुरु असताना अभिषेक यांचा भाऊ जेनिस आणि अन्य कुटुंबियांना अनोळखी क्रमांकावरुन फोन येऊ लागले. त्यात अभिषेक यांनी त्यांच्या कंपनीकडून कर्जाऊ रक्कम घेतली असून ती फेडण्यासाठी जामीनदार म्हणून त्यांचे नाव नोंदवले आहे. त्यामुळे आता ती रक्कम तुम्हाला चुकवावी लागेल अशा आशयाचे संभाषण या फोनवरुन होऊ लागले. या रक्कमेविषयी माहिती नसल्याने जेनिस यांनी त्या फोनवर नकार कळवला. त्यानंतर समोरुन त्यांना शिवीगाळही करण्यात आला.

फोनमुळे आला संशय

बनावट Application च्या फोनमुळे जेनिस यांना संशय आला. त्यानंतर त्यांनी अभिषेक यांचे इमेल्स तपासले. त्यात त्यांना एका बनावट ऑनलाईन Applicationविषयी माहिती मिळाली. हे Application तब्बल ३० टक्के व्याजदराने कर्जाऊ रक्कम देत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या Applicationकडून घेतलेली कर्जाऊ रक्कम परत करावी म्हणून त्यांना सतत कॉल येत होते. हे कॉल बांगलादेश तर कधी म्यानमार इथून येत होते.

धक्कादायक बाब म्हणजे या Applicationविषयी इंटरनेटवर माहिती शोधली असता ही बनावट कंपनी असून त्यांनी अनेकांना गंडा घातल्याचे उघड झाले. त्यानंतर जेनिस यांनी त्यांच्या भावाचे बँक डिटेल्स तपासले असता या Applicationतर्फे अभिषेक यांनी अर्ज न करताही काही रक्कम त्यांना पाठवण्यात येत असल्याचे जेनिस यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी या गोष्टीची संपूर्ण कल्पना कुटुंबियांना आणि पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलीस देखील शहानिशा करत असून त्यामुळेच अभिषेक यांनी आत्महत्या केली का? याचा ते शोध घेत आहेत.


हेही वाचा – कांदिवलीत दोन मुलांसह वडिलांची गळफास लावून आत्महत्या


 

First Published on: December 4, 2020 6:50 PM
Exit mobile version