मुलगी पळून गेल्याच्या रागात, मेव्हुण्याच्या पत्नीवर केले चाकूने वार!

मुलगी पळून गेल्याच्या रागात, मेव्हुण्याच्या पत्नीवर केले चाकूने वार!

मेव्हुण्याच्या पत्नीचा भावासोबत मुलगी पळून गेल्याच्या रागातून मेव्हुण्यांच्या पत्नीवर चाकूने हल्ला करून जीवे ठार मारण्याच्या प्रयत्न करण्यात आला आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या २४ वर्षीय विवाहितेला उपचारासाठी खाजगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी चितळसर पोलिसांनी हत्येच्या प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे. हि घटना ठाण्यातील घोडबंदर रोड येथील चितळसर मानपाडा येथे घडली.

सोनू सरवदे (२४) असे या विवाहितेचं नाव आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील चितळसर मानपाडा येथे पत्नी आणि लहान मुलासह राहणारी सोनू या विवाहितेची नणंद सुरेखा दुधाटे हि त्याच परिसरात राहतात. सुरेखा दुधाटे हिची १९ वर्षाच्या मुलीचे भावजयी सोनू हिच्या भावासोबत प्रेमप्रकरण सुरु होते. दरम्यान आठवड्याभरापूर्वी नणदेची मुलगी सोनू या विवाहितेच्या भावासोबत पळून गेली होती. या दोघांच्या पळून जाण्यामागे सोनू हीचा हात असल्याच्या संशयातून नणंद सुरेखा हीच पती मोहन आणि दुसऱ्या नणंदेचा पती राहुल हे दोघे सोनू हिच्या घरी आले होते. राहुल हा घरात जाऊन बसला मात्र मोहन याने सोनूला दारातच अडवून तिचा गळा पकडून ‘तुला माहित आहे माझी मुलगी कुठे आहे ते’ असे बोलून मोहनने खिशातून चाकू काढून सोनू या विवाहितेच्या गळ्यावर फिरवला. सोनुने मोहनच्या तावडीतून स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्नात तिच्या हातावर देखील चाकूची जखम झाली. दरम्यान शेजारीपाजाऱ्यांनी मोहनच्या तावडीतून सोनूची सुटका करून तिला ताबडतोब नजीकच्या ऑस्कर या खाजगी रुग्णालयात दाखल केले.

या घटनेची माहिती मिळताच चितळसर पोलीसानी घटनास्थळी धाव घेऊन मोहनला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. सोनू हिच्यावर ऑस्कर रुग्णलयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


हे ही वाचा – फोटोग्राफरचा मृतदेह ३ दिवस होता लटकलेल्या अवस्थेत, धक्कादायक कारण आलं समोर!


First Published on: August 31, 2020 8:41 PM
Exit mobile version