रायगडातील कोरोना मृतांच्या वारसांना मिळणार २१ कोटी

रायगडातील कोरोना मृतांच्या वारसांना मिळणार २१ कोटी

कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांना ५० हजार रुपयांची रक्कम मिळणार असल्याची माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिली असल्यामुळे रायगड जिल्ह्यातील कोरोना साथीत दगावलेल्या ४ हजार ३०२ जणांच्या वारसांना सुमारे २१ कोटींच्या आसपास मदत प्राप्त होणार आहे.गेल्या 2 वर्षांमध्ये कोरोनाच्या महामारीत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. काहींनी घरातले कर्ते सदस्य गमावले, तर काहींनी संपूर्ण कुटुंबच. कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनने एकीकडे सतत भासत असणारी आर्थिक चणचण आणि दुसरीकडे कोरोनाने घरातील सदस्य गमाविल्याचे दु:ख या दोन्हींचा समतोल साधताना सर्वांची अवस्था बिकट झालेली दिसून येत आहे. परंतु केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या माहितीमुळे नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे.

देशात आतापर्यंत ३.९८ लाख जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. रायगडमधील आतापर्यंताच्या कोरोना मृतांची एकूण संख्या ४ हजार ३०२ इतकी असून, त्यामध्ये पनवेल महानगरपालिका हद्दीत १ हजार ३२९, उरण ३०८, खालापूर ३१३, कर्जत १७९, पेण २९५, अलिबाग ३१०, मुरुड ५८१, माणगाव १०७, तळे १२५, रोहे २९, सुधागड २५८, श्रीवर्धन ७९, म्हसळे ९७, महाड ५४, तर पोलादपुरातील ५२ जणांचा समावेश आहे.  ही भरपाई आधी झालेल्या मृत्यूसाठीच नव्हे तर भविष्यातही देणार असल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले आहे.


हे ही वाचा – शेतकऱ्यांच्या भारत बंदला राहुल गांधींचा पाठिंबा; भाजपवर डागलं टीकास्त्र


 

 

First Published on: September 27, 2021 12:46 PM
Exit mobile version