घरदेश-विदेशशेतकऱ्यांच्या भारत बंदला राहुल गांधींचा पाठिंबा; भाजपवर डागलं टीकास्त्र

शेतकऱ्यांच्या भारत बंदला राहुल गांधींचा पाठिंबा; भाजपवर डागलं टीकास्त्र

Subscribe

कृषी कायद्यांच्या निषेधार्थ संयुक्त किसान मोर्चाने आज भारत बंदची (Bharat Bandh) घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या भारत बंदला काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला आहे. तसंच, केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. मोदी सरकारसा शोषण करणारं सरकार म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करत शेतकऱ्यांच्या भारत बंदला समर्थन दिलं आहे. शेतकऱ्यांचा अहिंसक सत्याग्रह आजही अखंड आहे. पण शोषण-कार सरकारला हे आवडत नाही, म्हणूनच आज भारत बंद आहे, असं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारने आणलेल्या तीन वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात संयुक्त किसान मोर्चाने आज ‘भारत बंद’ ला हाक दिली होती. या बंदला राजकीय पक्षांसह अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. या बंदला सकाली ६ वाजल्यापासून सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. शेतकऱ्यांनी विविध महामार्ग तसंच रेल्वे रुळ अडवले आहेत. विरोध लक्षात घेऊन दिल्ली वाहतूक पोलिसांनी गाझीपूर सीमेवर वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे, तर शेतकऱ्यांनी पंजाब-हरियाणा दरम्यान शंभू सीमा बंद केली आहे. काँग्रेस, डावे पक्ष, राजद, बसपा आणि सपासह देशातील जवळपास प्रत्येक विरोधी पक्षाने आधीच शेतकरी भारत बंदला पाठिंबा जाहीर केला आहे.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -