माथेरानमधील पॉईंट्स आता नव्या लूकमध्ये दिसणार

माथेरानमधील पॉईंट्स आता नव्या लूकमध्ये दिसणार

माथेरानमधील पॉईंट्स आता नव्या लूकमध्ये दिसणार

मुंबई आणि पुणे येथून सर्वात जवळचे आणि भारतातील सर्वात लहान गिरीस्थान अशी माथेरानची ओळख आहे. अद्भुत निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची वाटचाल माथेरानकडे वळते. माथेरानचा संपूर्ण माथा घनदाट झाडी आणि लाल पायवाटा यांनी नटलेला आहे. येथील पठाराची बरीचशी टोके तसेच पूर्व-पश्चिम व दक्षिणेकडील कडे कोसळले आहेत. ह्या कडांनाच पॉईंटस् म्हटले जाते. ज्या इंग्रजांनी माथेरान वसवले त्यांनीच या पॉईंट्सना नावे दिली, त्यामुळे सहाजिकच ती पॉईंट्सची नावे इंग्रजीत आहेत. या पॉईट्स ना सुरू असणाऱ्या क्ले पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यांमुळे एक नवा लूक पहावयास मिळणार आहे. त्यामुळे पायी प्रवास करणाऱ्या हौशी पर्यटकांना अगदी सहजपणे चालणे सोयीस्कर ठरणार आहे.

क्ले पेव्हर ब्लॉकमुळे होतो ‘हा’ एक फायदा

क्ले पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यामुळे पावसाळ्यात जमिनीची धूप थांबण्यास मदत होईल.अनेक वर्षापासून या रस्त्याच्या डागडूजीची कामे प्रलंबित करण्यात आली होती. येणाऱ्या पर्यटकांसाठी माथेरानमधील अद्भुत सौंदर्याने नटलेले पॉईंटस् हे खास आकर्षण आहे. यासाठी नगरपरिषदेने विविध पॉंईंट्सच्या सुशोभीकरणाची कामे सुरु करण्यात आली आहेत. यात मुख्यत्वे वीज,पाणी,रस्ते याच मुलभूत सुविधा आवश्यक असतात. येणाऱ्या पर्यटकांचा पायी प्रवास सुखकर व्हावा यासाठी हे काम हाती घेतले आहे.  दरम्यान अपूर्ण असलेली गावाची कामे सध्या उत्तमरित्या मार्गी लावण्यात येत आहेत. ही सर्व कामे दीर्घकाळ टीकावीत याशिवाय सुयोग्य पद्धतीने केली जात आहेत की नाही यासाठी गटनेते प्रसाद सावंत हे स्वत: आपल्या कार्यकर्त्यांसह जातीने लक्ष देत आहेत.


हेही वाचा – मुंबईकर जनता तुमच्या महापालिकेच्या कारभाराला कंटाळली – नारायण राणे


 

 

First Published on: August 19, 2021 12:51 PM
Exit mobile version