एकीकडे ‘महाराष्ट्र बंद’ तर दुसरीकडे ठाण्यात बेवारस बॅगेमुळे खळबळ, काय आहे प्रकरण?

एकीकडे ‘महाराष्ट्र बंद’ तर दुसरीकडे ठाण्यात बेवारस बॅगेमुळे खळबळ, काय आहे प्रकरण?

एकीकडे 'महाराष्ट्र बंद' तर दुसरीकडे ठाण्यात बेवारस बॅगेमुळे खळबळ, काय आहे प्रकरण?

लखीमपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. मुंबईसह ठाण्यात (Thane) या बंदला उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकीकडे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली असताना ठाण्यात मात्र एका बेवारस बॅगमुळे चांगलीच खळबळ उडाल्याचे पहायला मिळाले.आज सोमवारी दुपारच्या सुमारास ठाणे महापालिका मुख्यालयासमोरील कचराळी तलावाच्या (thane kachrali lake)  ठिकाणी एक बेवारस बॅग काही वेळापासून पडून होती. या बॅगेत काही संशयास्पद वस्तू असल्याच्या संशयाने ठाण्यात एकच खळबळ उडाली. मात्र ही बॅग एका अपंग व्यक्तीची असल्याचे समोर आले आणि ठाणेकरांनी सुटकेचा श्वास सोडला.

कचराळी तलावाच्या बाजूला असलेल्या पदपथावर एका अज्ञात व्यक्तीने बऱ्याच वेळापासून बेवारस बॅग ठेवली होती. बराच वेळ त्या बॅगेजवळ कोणीही न फिरकल्याने याची माहिती प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षेला देण्यात आली. माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी एक बॅग लोखंडी बेंचला बांधून ठेवण्यात आली होती. त्यानंतर काही वेळानंतर बॅगेचे मालक समीर कुमार सिंघ (४५) हे घटनास्थळी पोहोचले. ही व्यक्ती अपंग असल्याने त्यांच्या नातेवाईकांची वाट पाहत होती. सकाळी १० वाजताच्या सुमारास नाष्टा करण्यासाठी गेले असता त्यांनी आपली बॅग बेंचला बांधून ठेवली.

बराच वेळ समीर हे आपली बॅग घेण्यासाठी आले नाहीत. बॅग बेंचच्या अगदी मागच्या बाजूला एखाद्याला संशयास्पद वाटेल असापद्धतीने बांधून ठेवण्यात आली होती. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती कळताच घटनास्थळी पोलीस कर्मचारी तसेच प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी धाव घेतली. ती बॅग मालकाच्या ताब्यात देऊन पुन्हा अशी चूक करू नका असे बजावण्यात आले. त्यानंतर सदर व्यक्ती ही आपली बॅग घेऊन परिसरातून निघून गेली असल्याची माहिती कक्षाप्रमुख संतोष कदम यांनी दिली आहे.


हेही वाचा – नाशिक शहरातील महाराष्ट्र बंदची क्षणचित्रे

First Published on: October 11, 2021 1:43 PM
Exit mobile version