चार वेळा समन्स बजावूनही विहंग सरनाईक गैरहजर

चार वेळा समन्स बजावूनही विहंग सरनाईक गैरहजर

विहंग सरनाईक

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीच्या अधिकार्‍यांनी धाड टाकल्यानंतर त्यांच्या कुटुंबाची वारंवार चौकशी सुरू आहे. आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक यांचीदेखील ईडीकडून चौकशी करण्यात आली. मात्र, मंगळवारी विहंग सरनाईक चौकशीसाठी गैरहजर असल्याची माहिती समोर आली आहे. विहंग यांना ईडी अधिकार्‍यांनी चार वेळा समन्स बजावूनही ते चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. पण तो गेलाच नसल्याचे सांगण्यात येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने समन्स बजावून विहंग यांना चौकशीसाठी येण्यास सांगितले होते. पण तरीदेखील ते गैरहजर राहिले. महत्त्वाचे म्हणजे विहंग यांना आतापर्यंत तीनवेळा समन्स बजावण्यात आले आहेत. सोमवारी त्यांना चौथा समन्स बजावण्यात आला होता. यानुसार आज 1 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत त्याला हजर राहायला सांगण्यात आले होते. पण विहंग चौथ्या समन्सनंतरही ईडी कार्यालयात हजर झाला नाही. यामुळे आता ईडी विहंग यांच्यावर कडक कारवाई करण्याची असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ईडीने मंगळवारी (25 नोव्हेंबर) प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले होते. त्यानंतर विहंग यांची ईडीने पाच तास चौकशी केली. त्यानंतर प्रताप सरनाईक यांनाही नोटीस बजावून ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, आपण परदेशातून आल्याने आठ दिवस आपल्याला सक्तीने क्वारंटाईन राहावं लागत आहे. शिवाय विहंगची पत्नीही आजारी आहे. त्यामुळे मला चौकशीला उपस्थित राहता येणार नाही, असे सरनाईक यांनी ईडीला कळवले होते.

यानंतर आता आठ दिवसांनी प्रताप सरनाईकांना ईडीने पुन्हा एकदा समन्स जारी केला. यात ईडीकडून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, विहंग सरनाईक यांना ईडीने दोन वेळा समन्स बजावले आहे. मात्र ते चौकशीला हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांची पुन्हा एकदा ईडीकडून चौकशी होऊ शकते, असे सांगितले जात आहे. ही चौकशी टॉप ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

First Published on: December 2, 2020 6:43 AM
Exit mobile version