Shrivardhan : जागतिक वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा

Shrivardhan : जागतिक वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा

Shrivardhan : जागतिक वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा

श्रीवर्धनमध्ये आज जागतिक वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. सीसस्केप संस्था महाड आणि वनपरिक्षेत्र श्रीवर्धन यांच्या संयुक्त विद्यमाने हा जागतिक वन्यजीव सप्ताह उपक्रम राबवण्यात आला. गेली २३ वर्षे जिल्ह्यातील गिधाडांचे संवर्धन करण्याचे काम सिस्केप या संस्थेच्या माध्यमातून यशस्वी केले जात आहे. वनपरिक्षेत्र श्रीवर्धन कार्यालय येथे सीसस्केप संस्था महाड यांच्याकडून स्लाईड-शोचे आयोजन करण्यात आले. संस्थेतील पदाधिकारी यांनी शहरात जनजागृती रॅलीद्वारे गिधांडांविषयी ठिकठिकाणी माहिती दिली. यानंतर उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात वनविभाग कार्यालय श्रीवर्धन येथील प्रांगणात वन्यजीव सप्ताह च्या फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी सिस्केप संस्थेतर्फे गिधाड रेस्क्यू पिंजऱ्यांचे लोकार्पण करण्यात आले. झाडावरून पडलेली गिधाडांची पिल्ले यांचे सुरक्षित बचाव स्थळी नेण्यासाठी या पिंजऱ्याचा वापर करण्यात येणार आहे. तसेच, शहरात रॅली काढून पर्यावरण वाचवा गिधाड वाचवा अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी श्रीवर्धन वनपरिक्षेत्र अधिकारी मिलिंद राऊत व स्टाफ तसेच नगरसेवक वसंत यादव, नगरसेवक अनंत गुरव, माजी जिल्हापरिषद सद्स्य अविनाश कोळंबेकर, पुलेकर गुरुजी, सुनील यादव यांची प्रामुख्याने उपस्थित होते.

श्रीवर्धन तालुक्यात गिधाडांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येते. याला कारण म्हणजे श्रीवर्धन तालुक्यातील मोठे जंगल आणि मोठी वृक्ष, पोषक वातावरण असल्याने गिधाडांची उपासमार होत नाही. त्यामुळे इथेही आपली एक शाखा असावी, या हेतूने १ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर या जागतिक वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून श्रीवर्धन इथे बाळा वाणी यांच्या निवासस्थानी सीसस्केप संस्थेने महाडची शाखा उघडली आहे.

दरवर्षी जागतिक वन्यजीव सप्ताह उपक्रमाचे आयोजन करून विविध कार्यक्रम जिल्ह्यात राबविले जातात. यामध्ये गिधाड अभ्यास संशोधन आणि संवर्धन केंद्र यांच्या माध्यमातून महाड, पाली, चांदोरे, माणगाव, श्रीवर्धन, पांगलोली, म्हासळे, चिरगाव, नानेमाची अशा विविध भागांमधून शास्त्रीय संशोधन केले जाते. (वन्यजीव म्हणजे सर्व सजीव सृष्टी चा समावेश असलेली परिसंस्था तसेच वन्य जीवास उपयुक्त असे भौगोलिक वातावरण होय.)

एकोणीस वर्षे श्रीवर्धन – म्हसळा विभागात सिस्केप संस्था आणि रोहा वनविभाग यांच्या सहकार्याने पर्यावरण जनजागृतीचे काम परिसरातील विविध शाळा महाविद्यालये आणि सामाजिक संस्था यांच्या सहभागाने केले जाते. सन २००० मध्ये अवघ्या बावीस गणसंख्यावर असलेली गिधाडे आजमितीस ३५० वर येऊन पोहोचली आहेत. पुढील दशकात ही गणसंख्या साधारण सहाशेच्या आसपास पोहोचेल असा संकल्प संस्थेचे प्रकल्प संशोधक अधिकारी चिंतन वैष्णव, प्रणव कुलकर्णी, अनुराग मोरे आणि योगेश गुरव यांनी व्यक्त केला.

 

                                                                                वार्ताहर – सोपान निंबरे

 


हे ही वाचा – Gautam Adani : क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला अटक पण ट्रेण्डमध्ये गौतम अदानी, काय आहे कनेक्शन?


First Published on: October 3, 2021 7:23 PM
Exit mobile version