घरदेश-विदेशGautam Adani : क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला अटक पण ट्रेण्डमध्ये गौतम...

Gautam Adani : क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला अटक पण ट्रेण्डमध्ये गौतम अदानी, काय आहे कनेक्शन?

Subscribe

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझवर एनसीबीने छापेमारी करत मोठी ड्रग्ज पार्टी उधळून लावली आहे. याप्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह एकूण तीन जणांना एनसीबीने अटक केली आहे. या तिघांना आता वैद्यकीय चाचणीसाठी मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या चाचणीनंतर त्यांना किला कोर्टासमोर हजर केले जाणार आहे. एनसीबीने या कारवाईदरम्यान तब्बल ३० ग्रॅम चरस, २० ग्रॅम कोकेन, २० ग्रॅम टॅबलेट्स आणि १० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. या प्रकरणी सध्या आर्यन खानला जरी अटक झाली असली तरी सोशल मीडियावर भलताच ट्रेन्ड सुरु झाला आहे. सध्या ट्विटरवर आर्यन खानऐवजी गौतम अदानी ट्रेन्ड होताना दिसतायत.

नेटकऱ्यांकडून या प्रकरणाचा संबंध आता देशातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानींशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. नेटीजन्सनी दोन वेगळ्याप्रकारे अदानींशी हा संबंध जोडला आहे. पहिला प्रकार म्हणजे गौतम अदानींच्या मालकीच्या गुजरातमधील मुंद्रा पोर्टवरून काही दिवसांपूर्वी एनसीबीने तब्बल ३ हजार किलो वजनाचे ड्रग्ज साठा हस्तगत केले होता. यावरुन नेटीजन्सनी मुंबईत येणारा ड्रग्ज साठा अदानींच्या मालकीच्या पोर्टवरून आला का? असा सवाल उपस्थित केला आहे.

- Advertisement -

तर दुसरा म्हणजे एनसीबीने मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर कारवाई करत ३० ग्रॅम चरस, २० ग्रॅम कोकेन, २० ग्रॅम टॅबलेट्स आणि १० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले. यावरून सर्वत्र आता उलट-सुलट चर्चा रंगत आहेत. एनसीबीने शाहरुख खानच्या मुलाला अटक करत पुढील कारवाई सुरु केली आहे. पण अदानींच्या मालकीच्या गुजरात पोर्टवर अफगाणिस्तानातून आलेल्या तीन हजार किलोचा ड्रग्ज साठा जप्त केल्यानंतर त्यावर पुढे काय कारवाई झाली याची कोणतीही माहिती समोर आली नसल्याचे नेटीझन्सकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आर्यन खानऐवजी आता गौतम अदानी ट्वविटवर ट्रेन्ड होताना दिसतायत.

यावर काही नेटिझन्सनी आणखी एक सवाल उपस्थित करत म्हटले की, ड्रग्ज हे ड्रग्ज असतं. त्यामुळे अनेकांचे आयुष्य उद्धस्त होते. त्यामुळे १०० ग्रॅम ड्रग्ज सापडल्यानंतर जी कारवाई केली जाते ती मग तब्बल ३ हजार किलो ड्रग्ज सापडल्यानंतर का होत नाही?

- Advertisement -

एनसीबीने शनिवारी रात्री मुंबईतील एका क्रूझवर सुरु असलेल्या हायप्रोफाईल ड्रग्ज पार्टीवर छापेमारी केली. या कारवाईदरम्यान क्रूझवर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानही उपस्थित होता. त्यामुळे त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. अशातच आर्यन खानसह आत्ता एकूण तीन जणांना या प्रकरणी अटक झाली आहे. यात आर्यन खान, मुनमुन धामेचा आणि अरबाज मर्चंट यांचा समावेश आहे. किंग खानच्या मुलाच्या अटकेनंतर आता नुपूर सारिका, इश्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकर, गोमित चोप्रा यांचीही चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.

अदानी समूहाच्या मालकीचे असलेल्या गुजरातमधील मुंद्रा पोर्टवरून १५ सप्टेंबरला ३ हजार किलोचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या Directorate of Revenue Intelligence (DRI) आणि कस्टम विभागाने ही कारवाई केली होती. अफगाणिस्तानमधून दोन कंटेनरच्या माध्यमातून हिरॉईन (ड्रग्ज) भारतात आणले जात होतेय या ड्रग्जची किंमत तब्बल १५ हजार कोटी रुपये किंमतीचे असल्याची माहिती समोर आली होती.

अदानींच्या मालकीच्या मुंद्रा पोर्टवरून जप्त करण्यात आले अफगाणी ड्रग्ज

डायरेक्टोरेट ऑफ रिव्ह्येन्यू इंटेलिजन्सच्या (DRI) माहितीनुसार, गुजरातमधील कच्छ या भागातील अदानींच्या मालकीच्या मुंद्रा पोर्टवरून २ हजार ९८८ किलो अफगाणी ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. दोन कंटनेरमधून भरून आलेल्या ड्रग्जच्या पार्सलवर टॅल्कम पावडर आणण्यात येत आहे अशा प्रकारची कागदपत्रे रंगवण्यात आली होती. हे दोन्ही कन्टेनर अफगाणिस्तानमधील हसन हुसेन लिमिटेड या कंपनीने निर्यात केले होते. आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील एका कंपनीने हे निर्यात केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र मुंबईतील क्रूझ ड्रग्स प्रकरणाशी नेटीझन्सकडून अदानींच्या मालकीच्या मुंद्रा पोर्टवर सापडलेल्या ड्रग्जप्रकरणाचा संबंध लावला जात आहे. आणि यामुळेच अदानींना देखील ट्रेन्ड केलं जात आहे.


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -