सोनसाखळी चोरीच्या उद्देशाने युवकाची हत्या; आरोपीला २४ तासात अटक

सोनसाखळी चोरीच्या उद्देशाने युवकाची हत्या; आरोपीला २४ तासात अटक

प्रातिनिधिक छायाचित्र

सोनसाखळी चोरीच्या उद्देशाने भिवंडी तालुक्यातील कंरजोटी गावात राहणाऱ्या आकाश नारायण शेलार (२०) या युवकाची हत्या करणाऱ्या आरोपीला २४ तासांत गजाआड करण्यात ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेला यश आले आहे. ११ सप्टेंबर रोजी पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे करंजोटी, वडवली गावाच्या हद्दीत भास्कर गव्हाळे यांच्या शेतात आकाश नारायण शेलार याचा मृतदेह आढळला. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून ठाणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. शिवाजी राठोड, अप्पर पोलीस अधिक्षक संजयकुमार पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, व्यंकट आंधळे स्था.गु.शा.ठाणे ग्रामीण यांनी अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी सूचना दिल्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा वासिंद युनिट कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम लोंढे, पोलीस उप निरीक्षक गणपत सुळे, पो.हवा.साईल, पो.हवा.सुर्वे, पो.हवा.हाबळे, पो.ना. अमोल कदम, पोना हणुमान गायकर, पोना सुहास सोनावणे यांनी सदर गुह्याचा समांतर तपास सुरु केला.

वरिष्ठांच्या सुचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखा वासिंद पथकाने तत्काळ घटनास्थळाला भेट देऊन तपास सुरु केला. तपासाअंती आकाश नारायण शेलार याच्या घराच्या बाजूला शेजारी मयुर जाधव (२०) याची चौकशी केली असता त्याने आकाशच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरण्याच्या उद्देशाने गावाबाहेर शेतात बोलावून घेतले. त्याच्या डोक्यावर, तोंडावर लाकडी बॅट मारुन त्याला गंभीर मारहाण करत ठार मारले. सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असून कोणताही पुरावा नसताना तसेच आरोपीची ओळख नसताना दिलेल्या सुचनांप्रमाणे तपास पथक सहा.पोलीस निरीक्षक, परशुराम लोंढे, पोलीस उप निरीक्षक गणपत सुळे, पो.हवा.साईल, पो.हवा.सुर्वे, पो.हवा.हाबळे, पो.ना. अमोल कदम, पोना हणुमान गायकर, पोना सुहास सोनावणे यांनी अवघ्या २४ तासात गुन्ह्याची उकल केली.


हेही वाचा – Coronavirus Mumbai: मुंबईत आज १,४३१ रूग्णांना डिस्चार्ज; ३१ मृत्यू


 

First Published on: September 14, 2020 10:32 PM
Exit mobile version