Coronavirus Mumbai: मुंबईत आज १,४३१ रूग्णांना डिस्चार्ज; ३१ मृत्यू

मुंबईत आतापर्यंत एकूण १,३२,३४९ रूग्ण बरे झाले आहेत

mumbai corona update Mumbai reports 259 coronavirus cases and 9 deaths in last 24
Mumbai Corona Update: मुंबईकरांना दिलासा! २४ तासांत कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्क्यांवर

राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरूच आहे. आज सोमवारी मुंबईत दिवसभरात २ हजार २५६ रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ७१ हजार ९४९ वर पोहोचला आहे. तर दिवसभरात ३१ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत मुंबईत एकूण ८ हजार १७८ जणांना मृत्यू झाला आहे. तर २४ तासात १,४३१ बरे झालेल्या रुग्णांची संख्या असून आतापर्यंत एकूण १,३२,३४९ रूग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ७७ टक्के इतका झाला आहे.

मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. तर १ हजार ४३१ रुग्ण आज दिवसभरात बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे मुंबईत कोरोनातून बऱ्या झालेल्या एकूण रुग्णांची संख्या १ लाख ७१ हजार ९४९ इतकी झाली आहे. तर ३१ हजार ६३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

मृतांमध्ये २४ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये १८ पुरुष तर १३ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील ३ जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. २४ जणांचे वय ६० वर्षांवर आहे. तर उर्वरित ४ रूग्ण ४० ते ६० वर्षादरम्यान होते, अशी माहिती पालिकेच्या आरोग नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.१६ टक्के

राज्यात गेल्या २४ तासांत राज्यात १७ हजार ०६६ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २५७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १० लाख ७७ हजार ३७४ वर पोहोचला आहे. तसेच गेल्या २४ तासांत १५ हजार ७८९ रुग्ण बरे होऊ घरी गेले असून आातपर्यंत एकूण ७ लाख ५५ हजार ८५० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.१६ टक्के एवढे झाले आहे. तर सध्याचा मृत्यूदर २.७७ टक्के एवढा आहे.