मुंबईतील विहिरींची माहिती अद्ययावत करून सभागृहासमोर ठेवा; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

मुंबईतील विहिरींची माहिती अद्ययावत करून सभागृहासमोर ठेवा; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

Neelam Gorhe took note of the offensive video in Bhandara district PPK

मुंबईतील विहिरींची माहिती अद्ययावत करून सध्याच्या घडीला किती विहिरी आहेत. यातील पाणी पिण्यालायक आहे का? यामध्ये असलेलं पाणी कोण वापरतय याची माहिती देण्याची सूचना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज विधानपरिषदेत केली.

लक्षवेधी प्रश्नांतर्गत विधान परिषद सदस्य सचिन अहिर यांनी मुंबईमधील रस्त्यांच्या निधीमधील घोटाळा, वेगाने वाढत चाललेल्या सिमेंट काँक्रीटच्या जंगलामुळे बांधकामासाठी पाणी उपलब्ध होत नसल्याबाबत सभागृहात प्रश्न उपस्थित केला. दरम्यान या लक्षवेधीतील मुंबईत असणाऱ्या विहिरी नामशेष होत चालल्या बाबतचा मुद्दा दुर्लक्षित झाला होता. त्यामुळे तात्काळ उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तो मुद्दा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या लक्षात आणून दिला.

यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, या लक्षवेधी मधील महत्वाचा भाग समोर आलेला नाही, तो म्हणजे मुंबईतील विहिरींच्या संदर्भातील प्रश्न. या लक्षवेधीत १९ हजार विहिरींपैकी अनेक विहीरी नामशेष झाल्याने परिस्थिती गंभीर झाली असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मुंबईतील विहिरींची माहिती अद्ययावत करून सध्याच्या घडीला किती विहिरी आहेत. यातील पाणी पिण्यालायक आहे का? यामध्ये असलेलं पाणी कोण वापरतय याची माहिती महिनाभरात देण्यात यावी. यातून कोण टँकर माफिया आहेत हे समोर येईल. यावेळी उदय सामंत यांनी माहिती अद्ययावत करून सभागृहासमोर ठेवली जाईल, अशी माहिती सभागृहात दिली.

गेल्या काही दिवसांत मुंबईमध्ये पाण्याची मोठी समस्या निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे मुंबईत ज्या काही विहिरी शिल्लक राहिलेल्या आहेत, त्या विहिरीतील पाणी उपसून ते अवैधरित्या विकणाऱ्या लोकांचा सुळसुळाट झालेला आहे. ज्यामुळे ठाकरे गटाचे विधानपरिषदेतील आमदार सचिन अहिर यांनी हा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. ज्यानंतर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सुद्धा सभागृहाचे लक्ष या प्रश्नाकडे वेधण्याचे महत्वाचे काम केले.

हेही वाचा – सरकारकडून ५०० कोटींचा घोटाळा दाबण्याचा प्रयत्न, अजित पवारांचा आरोप

दरम्यान, मुंबईमध्ये अनेक जुन्या विहिरी अशा आहेत, ज्या नामशेष होत चालल्या आहेत. त्यांची स्वच्छता राखली न गेल्याने आणि मुंबईतील जुन्या विहिरींकडे दुर्लक्ष झाल्याने आमदार सचिन अहिर यांनी हा लक्षवेधीमध्ये हा प्रश्न उपस्थित केला.

First Published on: March 9, 2023 2:15 PM
Exit mobile version