7th Pay commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुशखबर! DA मध्ये होणार 13 टक्क्यांची वाढ

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण 7 व्या वेतन आयोगाअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढणार आहे. सरकारने 5 व्या आणि 6 व्या वेतन आयोगाच्या कर्मचाऱ्यांनाही भेट दिली आहे. या कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 13 टक्के वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच आता या कर्मचाऱ्यांनाही उर्वरित केंद्रीय कर्मचाऱ्यांइतकाच महागाई भत्ता दिला जात आहे. केंद्रीय कर्मचार्‍यांमध्ये असे अनेक कर्मचारी आहेत ज्यांना आतापर्यंत 7 व्या वेतन आयोगाचा लाभ मिळत नाही. अशा कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. या महिन्यात कर्मचाऱ्यांच्या अकाऊंटमध्ये नवीन महागाई भत्ता केड्रिट होणे सुरु झाले आहे.

मंत्रालयाने घेतला निर्णय

अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ‘5 व्या वेतन आयोगांतर्गत पगार मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांचा DA आता 381 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे, तर 6 व्या वेतन आयोगांतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा DA हा 196 टक्क्यांवरून 203 टक्के करण्यात आला आहे. म्हणजेच 7 टक्क्यांनी हीवाढ झाली आहे. या कर्मचाऱ्यांना वाढीव DA चा लाभही जानेवारी 2022 पासून लागू करण्यात आला आहे. या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांची थकबाकीही दिली जात आहे.

ज्या कर्मचाऱ्यांना आतापर्यंत सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळत नव्हता, तसेच केंद्रीय विभाग किंवा स्वायत्त संस्थांमध्ये काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगात अद्याप समाविष्ट करण्यात आलेले नाही. मात्र वित्त मंत्रालयाच्या या घोषणेनंतर 5 व्या आणि 6 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना 7 ते 13 टक्क्यांपर्यंत DA चा लाभ मिळू लागला आहे. या घोषणेमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारातही बंपर वाढ झाली आहे.


Monsoon 2022 : यंदा जूनमध्ये पडणार इतका पाऊस, हवामान खात्याचा सुखद अंदाज

First Published on: May 31, 2022 4:22 PM
Exit mobile version