ITR date extended: रिटर्न भरण्यासाठी दिली १० दिवसाची मुदतवाढ

ITR date extended: रिटर्न भरण्यासाठी दिली १० दिवसाची मुदतवाढ

करदात्यांची चिंता मिटली! Income Tax Return दाखल करण्यासाठी मुदतवाढ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने आयटीआर दाखल करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. करदात्यांनी ज्यांचे खाते लेखा परीक्षण करावयाचे आहे. त्यांच्या मूल्यांकना २०२०-२१ साठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची मुदत तारीख १५ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयाने दिली आहे.

दरम्यान, ज्या व्यक्तींची खाती ऑडिटसाठी ठेवण्यात आली आहेत, त्यांच्यासाठी अंतिम मुदत १५ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच ट्रस्ट योजनेची तारीखही ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे. तर दोन्ही प्रकरणांमधील शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२० होती. पण, आता त्यांची वाढ करण्यात आली आहे. एकंदरीत कर विभागाने वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये मुदत वाढविली आहे.

First Published on: December 30, 2020 8:42 PM
Exit mobile version