घरदेश-विदेशनवीन कृषी कायदा बैठक : केंद्र सरकारची 'Lunch Diplomacy'

नवीन कृषी कायदा बैठक : केंद्र सरकारची ‘Lunch Diplomacy’

Subscribe

गेल्या काही बैठकांमध्ये नवीन कृषी कायद्यांबाबतचा तिढा सुटलेला नसतानाच आता सरकारमधील मंत्र्यांनी लंच डिप्लोमसीचा पर्याय वापरून पाहिला. आंदोलनाच्या जागी शेतकऱ्यांनी लंगरच्या ठिकाणी तयार केलेले जेवण बैठकीसाठी आणले होते. तेच जेवण खाताना आज केंद्रातले मंत्रीही दिसले. याआधीच्या बैठकांमध्ये शेतकऱ्यांनी आणि मंत्र्यांनी वेगवेगळे असे जेवण केले होते. पण आज मात्र शेतकरी आंदोलक आणि सरकारमधील मंत्री एकत्र जेवताना दिसले. नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी याआधीच सरकारचा पाहुणचार नाकारला होता. बुधवारी दिल्लीत विज्ञान भवन येथे आयोजित बैठकीत मात्र सरकारने लंच डिप्लोमसीची क्लुप्ती वापरली.

- Advertisement -

आज बुधवारी दुपारी झालेल्या जेवणाच्या वेळात मात्र सरकारमधील मंत्री असलेले पियूष गोएल, नरेंद्र सिंह तोमर यांनी सरकारसोबतच जेवण करणे पसंत केले. शेतकऱ्यांकडूनच या मंत्र्यांनी आज दुपारी जेवण देण्यात आले. गेल्या काही दिवसात नव्या कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांसोबत बसून तोडगा काढण्याचे सरकारचे सगळे प्रयत्न हे अयशस्वी ठरले आहेत. दरम्यानच्या काळात सरकारकडूनही सांगण्यात आले आहे की, नवीन कृषी कायदे हे कशा प्रकारे त्यांच्या फायद्याचे आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या भल्याचेच कायदे असल्याचेही सरकारकडून वेळोवेळी सांगण्यात आले आहे. आज विज्ञान भवनात सुरू असलेल्या बैठकीत काही तरी तोडगा निघेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. नवीन कृषी कायद्याविरोधात पंजाब, हरियाणातील शेतकऱ्यांकडून महिन्याभरापेक्षा जास्त वेळ हे आंदोलन सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -