फ्लिपकार्टला ३२०० कोटींचा फटका

फ्लिपकार्टला ३२०० कोटींचा फटका

फ्लिपकार्ट तोट्यात

दिवाळी बंपर धमाका, फेस्टिव धमाका असे एक ना अनेक बंपर सेल सध्या ऑनलाईन कंपन्या देत आहेत. बंपर सेल पाहून खरेदीसाठी ग्राहकांच्या देखील उड्या पडत आहेत. सध्या फ्लिपकार्टनं तर ऑनलाईन खरेदीचं जगच व्यापून टाकल्याचं चित्र आहे. पण, ऑनलाईनच्या या स्पर्धेत फ्लिपकार्ट कंपनीला तब्बल ३२०० कोटी रूपयांचा फटका बसला आहे. तुमचा विश्वास बसत नाही ना? पण सध्या जी आकडेवारी समोर आली आहे त्यावरून फ्लिपकार्टला सहन करावा लागलेला तोटा समोर आला आहे. अॅमेझॉन सोबतची स्पर्धा फ्लिपकार्टला तोट्यात घेवून गेली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत फ्लिपकार्टचा हा तोटा ७५० टक्क्यानं वाढला आहे. मार्च २०१८ पर्यंत फ्लिपकार्टला ३२०० कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे. २०१७ साली फ्लिपकार्टनं १५,२६४ कोटींचा बिझनेस केला. तर २०१८मध्ये फ्लिपकार्टनं २१,६५७ कोटींचा बिझनेस केला. पण, २०१७ साली फ्लिपकार्टला २४४ कोटींचा तोटा सहन करावा लागला आणि २०१८ साली फ्लिपकार्टला २०६४ कोटींचा तोटा सहन करावा लागला. २०१८ साली कंपनीच्या भारतातील बिझनेसमध्ये ४२ टक्क्यांनी वाढ झाली. पण, सध्या वाढत्या स्पर्धेमुळं कंपनीला ३२०० कोटींचा तोटा सहन करावा लागला.

वाचा – फ्लिपकार्ट, अॅमेझॉन इंडियाचा धमाका, लाखभर नोकऱ्या मिळणार!

ऑनलाईन बंपर सेल

वॉलमार्टनं फ्लिपकार्टची खरेदी केली आहे. सध्या फ्लिपकार्टची स्पर्धा ही अॅमझॉन या ऑनलाईन कंपनीशी सुरू आहे. फ्लिपकार्टवर सध्या अनेक प्रकारचे सेल सुरू आहेत. मोठ मोठे डिस्काऊंट देऊन ग्राहकांना खेचण्यासाठी दोन्ही कंपन्यामध्ये स्पर्धा सुरू आहे. त्याचा परिणाम हा फ्लिपकार्टला बसला असण्याचा अंदाज आहे. कारण मार्च २०१८ या आर्थिक वर्षामध्ये कंपनीला ३२०० कोटींचा सहन करावा लागला आहे.

वाचा – Flipkart दिवाळी धमाका; ८० टक्के सूट

First Published on: October 29, 2018 5:01 PM
Exit mobile version