घरआली दिवाळी २०१८Flipkart दिवाळी धमाका; ८० टक्के सूट

Flipkart दिवाळी धमाका; ८० टक्के सूट

Subscribe

१ ते ५ नोव्हेंबर दरम्यान ग्राहक Flipkart च्या 'बिग फेस्टिव्हल सेल'चा लाभ घेऊ शकणार आहेत.

फ्लिपकार्ट ही वेबसाईट ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांच्या गळ्यातील ताईत आहे. फ्लिपकार्टनेही नेहमीप्रमाणेच आपल्या ग्राहकांच्या हिताचा विचार करुन, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा बंपर सेल आणला आहे. खास दिवाळीसाठी फ्लिपकार्ट कंपनीने ‘बिग फेस्टिव्हल सेल’ जारी केला आहे. येत्या १ ते ५ नोव्हेंबर दरम्यान ग्राहक या बंपर सेलचा लाभ घेऊ शकतात. या ‘बिग फेस्टिव्हल सेल’मध्ये अनेक वस्तूंवर भरघोस सूट देण्यात येणार आहे. स्मार्टफोनपासून ते गृहपयोगी वस्तूंपर्यंत विविध उत्पादनांवर तब्बल ८० टक्के सूट फ्लिपकार्टने जाहीर केली आहे. याशिवाय बऱ्याचशा वस्तूंसाठी एक्सेंच ऑफर्स आणि त्यासोबतच अॅक्सिडेंटल वॉरंटीससुद्धा देण्यात येणार आहे. मोबाईल फोन्स, लॅपटॉप, टीव्ही, वॉशिंग मशीन तसंच फॅशन अॅक्सेसरीज अाणि मोबाईल अॅक्सेसरीजसारख्या अनेक उत्पादनांवर Flipkart कडून भरघोस सूट देण्यात येणार आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फ्लिपकार्टकडून जारी करण्यात आलेला हा बंपर सेल ग्राहकांना आकर्षित करणारा आहे.


वाचा: मुंबईत GST घोटाळ्यातील पहिली अटक!

फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन या दोन्ही ई-कॉमर्स साईट्सवर काही दिवसांपूर्वीही सेल सुरु होता. फ्लिपकार्टवर फेस्टिव्ह धमाका आणि अॅमेझॉनवर ग्रेट इंडियन फेस्टिव्हल नावाचा सेल सुरु होता. त्यापैकी फ्लिपकार्टच्या फेस्टिव्ह धमाका सेलमध्ये कपड्यांवर ९० टक्के आणि इलेक्ट्रिक वस्तूंवर ८० टक्के सूट देण्यात आली होती.


वाचा: ऑन ड्युटी! कर्तव्यनिष्ठ पोलीस ‘आई’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -