Karvy Scam: NSE आणि BSE ला मोठा झटका; सेबीनं ठोठावला मोठा दंड

Karvy Scam: NSE आणि BSE ला मोठा झटका; सेबीनं ठोठावला मोठा दंड

नवी दिल्लीः बीएसई आणि एनएसईला मोठा झटका बसला आहे. बाजार नियामक सेबीनं देशातील दोन प्रमुख स्टॉक एक्सचेंज बीएसई आणि एनएसईला दंड ठोठावलाय. सेबीनं हा दंड कार्वी स्टॉक ब्रोकिंग लिमिटेड घोटाळ्याप्रकरणी लावला आहे.

सेबीनं जारी केली ऑर्डर

सेबीनं यासाठी एक ऑर्डर जारी केलीय. बीएसई आणि एनएसईने कार्वी स्टॉक ब्रोकिंगद्वारे ग्राहकांना सिक्युरिटीजचा दुरुपयोग रोखण्यासाठी योग्य वेळी पाऊल उचललं नाही. तसेच या प्रकरणाचा तपास करण्यात दिरंगाई दाखवली. त्यामुळे सेबीनं हा दंड ठोठावला आहे.

जाणून घ्या किती ठोठावला दंड?

सेबीनं आपल्या आदेशानुसार बीएसईवर 3 कोटी रुपये आणि एनएसईवर 2 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. ब्रोकरेज कंपनी कार्वी स्टॉक ब्रोकिंगवर 2 हजार कोटींचा घोटाळ्याचा आरोप लावण्यात आला आहे. या घोटाळ्याला देशातील सर्वात मोठा इक्विटी ब्रोकर घोटाळा सांगण्यात आलं आहे.

जाणून घ्या काय आहे प्रकरण?

सेबीकडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार, कार्वी स्टॉक ब्रोकिंगने ग्राहकांच्या खात्यात ठेवलेले शेअर्स विकून 1,096 कोटी रुपये आपल्या समूहाची कंपनी असलेल्या कार्वी रिएल्टीमध्ये ट्रान्सफर केले. एप्रिल 2016 ते डिसेंबर 2019 दरम्यान शेअर्सची विक्री करण्यात आली. त्यानंतर सेबीनं याची चौकशी लावली असता घोटाळा समोर आला. सेबीनं सुरुवातीलाच सांगितलं होतं की, ब्रोकरेज कंपनी ग्राहकांच्या सिक्युरिटीजचा दुरुपयोग करत आहे. हा घोटाळा समोर आल्यानंतर सेबीनं कार्वी स्टॉक ब्रोकिंग नवे ग्राहक बनवण्यापासून रोखलं आहे.


हेही वाचाः कोकणातल्या हापूस आब्यांची ‘अमेरिका’ स्वारी; पुन्हा निर्यातीला सुरुवात

First Published on: April 13, 2022 4:27 PM
Exit mobile version