LICची नवी योजना; ‘बचत प्लस योजन’चे जबरदस्त फायदे, जाणून घ्या एका क्लिकवर

LICची नवी योजना; ‘बचत प्लस योजन’चे जबरदस्त फायदे, जाणून घ्या एका क्लिकवर

LICची खास पॉलिसी, २८ रुपयांमध्ये मिळणार २ लाखांचा फायदा

सध्याच्या घडीला पाहिला गेल तर सर्वचजण पैसे कमवण्यासाठी काम करत असतात. मग कोणाला घर खरेदी करायचे असते. तर काही जणांना आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी पैसे कमवायचे असतात. तर बरेच जण सेवानिवृत्त झाल्यानंतर राहिलेले दिवस आंनदाने जगण्यासाठी पैसे कमवून ठेवतात. मात्र, या सर्व गोष्टींसाठी बचतही करावीच लागते आणि बचत करण्यासाठी विविध योजनांचा देखील वापर करण्यात येतो. यामध्ये बरेच ग्राहक हे सर्वात मोठी जीवन विमा कंपनी म्हणजे भारतीय जीवन विमा कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC)चा वापर करतात. ही विमा कंपनी प्रत्येक वेळी ग्राहकांच्या फायद्याकरता काही खास योजना आणत असते. नुकतीच या कंपनीने एक योजना आणली आहे. ज्याचा तुम्हाला अधिक फायदा होण्यास मदत होईल. ‘बचत प्लस’, असे या योजनेचे नाव आहे.

कोणती आहे ही योजना?

एलआयसीने ‘बचत प्लस’ योजना बाजारात आणली आहे. जी योजना बचतीबरोबरच सुरक्षा पुरवते. कंपनीने म्हटले आहे की, या योजनेत पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या कुटुंबाला ५ वर्षांच्या मुदतीसह आर्थिक सहाय्य देते. तसेच त्या दरम्यान जर पॉलिसीधारक मुदतपूर्तीच्या कालावधीपूर्वी मृत्यूमुखी पडला तर त्यांच्या कुटुंबास आर्थिक मदत मिळणार.

अशी खरेदी करु शकता पॉलिसी

ही पॉलिसी खरेदी करायची असल्यास एलआयसी वेबसाईट www.licindia.in द्वारे ऑनलाईन खरेदी करु शकता. तसेच एजेंट्स किंवा इतर मध्यसंस्थांद्वारे ऑफलाईनद्वारे देखील खरेदी करता येऊ शकते.

काय आहेत खास बाबी

First Published on: April 12, 2021 5:49 PM
Exit mobile version