Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश भारताला मिळाली तीसरी लस; रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीच्या वापराला परवानगी

भारताला मिळाली तीसरी लस; रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीच्या वापराला परवानगी

Related Story

- Advertisement -

भारतीयांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताला तीसरी लस मिळाली आहे. रशियाच्या स्पुटनिक लसीच्या वापरासाठी केंद्रीय मंत्रालयाने परवानगी दिली आहे. सोमवारी, लस संबंधातील तज्ज्ञ समितीनं रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ या लसीला मंजुरी दिली आहे. रशियाच्या गामालय सेंटरने ही लस विकसित केली आहे. लवकरच DCGI या लसीला परवानगी देण्याची शक्यता आहे.

भारतात ‘स्पुटनिक व्ही’ची हैदराबादच्या डॉ. रेड्डी लॅब्ससोबत मिळून ट्रायल करण्यात आली. तसंच त्यांच्यासोबतच या लसीचं उत्पादनही सुरू आहे. अशातच या लसीच्या वापराला मंजुरी मिळाल्यानंतर भारतात लसीच्या तुटवड्यासंबंधी तक्रारी कमी होण्याची शक्यता आहे. स्पुटनिक लसीच्या प्रतिबंधित वापरासाठी परवानगी देण्यात आली असली तरी अद्याप याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

- Advertisement -

देशात सध्या सीरम इन्स्टिट्युटच्या ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या लसींचा वापर केला जातोय. मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यापर्यंत भारतात सहा लसींच्या वापराला परवानगी दिली जाऊ शकते. देशात सुरू करण्यात आलेल्या सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला यामुळे हातभार लागू शकतो. कारण देशात काही राज्यांमध्ये लसींचा तुटवडा जाणवत आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -