PAN-AADHAAR : ‘या’ बचत योजनांसाठी पॅन-आधार अनिवार्य

PAN-AADHAAR : ‘या’ बचत योजनांसाठी पॅन-आधार अनिवार्य

भविष्यात आर्थिक संकटाचा सामना करावा लागू नये यासाठी बऱ्याचदा आपण गुंतवणूक करून ठेवत असतो. सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकांपासून ते पोस्टात नागरिकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. परंतु, आगामी काळात या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांना आधार-पॅन कार्ड क्रमांक अनिर्वाय असणार आहे. अर्थ मंत्रालयाने यासंबंधीचं नोटिफिकेशन काढलेलं आहे. (PAN AADHAAR is mandatory for savings schemes)

पीपीएफ अर्थात भविष्य निर्वाह निधी, ज्येष्ठ नागरिक बचत योजना यासह पोस्टाच्या योजना आणि महिला सन्मान योजनांसाठी पॅन आणि आधार क्रमांक अनिवार्य करण्यात आलेला आहे. याबाबत शुक्रवार 31 मार्च रोजी अर्थ मंत्रालयाकडून अधिसूचना काढण्यात आल्या. त्यापूर्वी आधार क्रमांकाशिवाय ग्राहकांना गुंतवणुकीचा पर्याय होता. परंतु आता आधार क्रमांक अनिवार्य करण्यात आलेला आहे.

सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पॅन आणि आधार क्रमांक असणे आवश्यक आहे. पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडण्यावेळी जर आधार क्रमांक नसेल तर नाव नोंदणी केल्याची स्लिप देण्याची मुभा आहे. मात्र सहा महिन्याच्या आत आपल्या खात्याला आधार क्रमांक जोडणे बंधनकारक असणार आहे.

एखाद्या नागरिकाला पोस्टात गुंतवणूक खाते उघडायचे असेल तर, पॅन किंवा फॉर्म ६० भरणे आवश्यक आहे. खाते उघडताना पॅन सबमिट केलेले नसल्यास दोन महिन्यांच्या आत ते देणे आवश्यक आहे. तसे न केल्यास खाते गोठवले जाणार आहे. केवळ पोस्ट ऑफिसच नाही तर बँकेतही हे नियम लागू करण्यात आलेले आहेत.

आतापासून लहान बचत योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पासपोर्ट फोटो, आधार किंवा आधार नोंदणी स्लिप आणि पॅन कार्ड अनिवार्य करण्यात आलेले आहे. त्याशिवाय खात्याशी संबंधीत व्यवहारांवर टाच येणार आहे.


हेही वाचा – दिलासादायक! भारतातील ‘या’ तीन बँका बुडणार नाहीत; वाचा नेमके कारण काय?

First Published on: April 1, 2023 8:09 PM
Exit mobile version