SBI Recruitment 2021: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ९३ जागांसाठी भरती

SBI Recruitment 2021: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ९३ जागांसाठी भरती

नोकरी शोधणाऱ्या आणि सरकारी नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या तरूणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या एसबीआयने मोठी नोकरभरती काढली आहे. एसबीआयमध्ये स्पेशलिस्ट केडर ऑफिसर (SCO) आणि क्लेरिकल केडरमध्ये फार्मासिस्टच्या एकूण ९३ पदांकरता भरती काढण्यात आली आहे. याबाबतची जाहिरात जारी करण्यात आली आहे.

याठिकाणी उपलब्ध होऊ शकतो अर्ज

बँकेद्वारे सहा विविध जाहीरातींमार्फत विविध पदांसाठी आजपासून भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. याकरता ऑनलाईन अर्ज देखील भरु शकता. याकरता इच्छुक आणि योग्य उमेदवारांनी एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर sbi.co.in वर जाऊन फॉर्म भरु शकता. तसेच ऑनलाइन application फॉर्मच्या माध्यमातून अर्ज करता येऊ शकतो. तसेच ही भरती प्रक्रिया ३ मेपर्यंत पूर्ण करायची आहे.

असा करा अर्ज

अर्जासाठी उमेदवारांनी एसबीआयच्या वेबसाईटवर जावे. त्यानंतर करिअर सेक्शनमध्ये जाऊन तेथे लेटेस्ट अनाउंसमेंट्स सेक्शनमध्ये जावे. या भरती जाहीरातीसोबत अप्लाय ऑनलाइनच्या लिंकवर क्लिक करुन application पेजवर जाता येईल. तसेच उमेदवार पुढे दिलेल्या डायरेक्ट लिंकद्वारे देखील अर्जांच्या पेजवर जाऊ शकतो.

या पदांसाठी भरती

फार्मासिस्ट – ६७ पदे, डेप्युटी सीटीओ – १ पद, मॅनेजर (हिस्ट्री) – २ पदे, चीफ एथिक्स ऑफिसर – १ पद, एडवायजर (फ्रॉड रिस्क मॅनेजमेंट) – ४ पदे, डेप्युटी मॅनेजर (स्ट्रॅटेजिक ट्रेनिंग) – १ पद, डाटा अॅनालिस्ट – ८ पदे, मॅनेजर (रिस्क मॅनेजमेंट) – १ पद, मॅनेजर (क्रेडिट एनालिस्ट) – २ पदे, सीनियर स्पेशल एक्झिक्युटिव (कॉम्पलीयंस) – १ पद, सीनियर स्पेशल एक्झिक्युटिव (स्ट्रेटेजी टीएमजी) – १ पद, सीनियर स्पेशल एक्झिक्युटिव (ग्लोबल ट्रेड) – १ पद, सीनियर, एक्झिक्युटिव (रिटेल आणि सब्सीडियरीज) – १ पद, सीनियर एक्झिक्युटिव (फायनान्स) – १ पद, सीनियर एक्झिक्युटिव (मार्केटिंग) – १ पद


हेही वाचा – काय सांगताय? ज्या Remdesivirकरता नातेवाईक वणवण करतायत ते प्रभावीच नाही


 

First Published on: April 13, 2021 4:18 PM
Exit mobile version