घरताज्या घडामोडीकाय सांगताय? ज्या Remdesivirकरता नातेवाईक वणवण करतायत ते प्रभावीच नाही

काय सांगताय? ज्या Remdesivirकरता नातेवाईक वणवण करतायत ते प्रभावीच नाही

Subscribe

रेमडेसिवीर इंजेक्शन कोरोना रुग्णांवर प्रभावी ठरत नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.

देशात पुन्हा एकदा कोरोनाने अरक्षश: धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. दिवसागणिक लाखोंच्या संख्येने रुग्णांची वाढ झाल्याने पुन्हा एकदा चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर देखील याचा ताण आला आहे. दरम्यान, लसींचा तुटवडा आणि रेमडेसिवीर मिळत नसल्यामुळे अनेक नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. बऱ्याच जणांना रेमडेसिवीर इंजेक्शन न मिळाल्यास आपल्या माणसाचा मृत्यू होईल, अशी देखील भिती वाटत आहे. मात्र, या इंजेक्शनला जितके महत्त्व दिले जाते ते खरच प्रभावी ठरत आहे का?, असा प्रश्न असताना जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) हे इंजेक्शन प्रभावी ठरत नसल्याचे स्पष्ट केले आहे. (WHO says that remdesivir injection is not effective on corona patients) याबाबत कोणताही पुरावा नसल्याचे सांगितले आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शनवर प्रश्नचिन्ह

WHOने मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथ आणि कोविडच्या टेक्निकल हेड डो मारिया वेन केरखॉव्ह यांनी ‘इंडिया टुडे’शी बोलताना रेमडेसिवीर इंजेक्शनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, ‘रेमडेसिवीर इंजेक्शनच्या आतापर्यंत पाच चाचण्या करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यातून असे स्पष्ट झालेले नाही की, या इंजेक्शनमुळे कोरोना रुग्ण बरा झाला आहे किंवा मृत्यू झाला नाही. विशेष म्हणजे अजून एक मोठा रिपोर्ट येणे बाकी आहे. त्यावरुन हे इंजेक्शन खरच प्रभावी ठरत आहे की नाही ते कळेल.

- Advertisement -

रेमडेसिवीर इंजेक्शनवर बंदी

देशात रेमडेसिवीर इंजेक्शनची मोठी मागणी वाढली आहे. मागणी वाढल्यामुळे बऱ्याच देशातील स्टॉक देखील संपला आहे. विशेष म्हणजे भारतात हे इंजेक्शन मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. परंतु, आता या इंजेक्शनचा स्टॉक संपल्यामुळे बाहेरील देशातील निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे.

कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी या इंजेक्शनचा वापर करण्यात आला होता. मात्र, त्यामुळे कोरोना रुग्ण बरा झाला किंवा मृत्यू टळला, असे काहीही झाले नाही. तर काही अभ्यासांत, असेही समोर आले आहे की, हे इंजेक्शन कोरोना रुग्णांवर चांगला परिणाम दाखवत आहे. तसेच यामुळे मृत्यू दरही कमी झाला आहे. परंतु, ज्यावेळी मोठ्या ट्रायलच्या निकालानंतरच यावर काही बोलता येईल.  – डॉ. स्वामीनाथन

- Advertisement -

सध्या या इंजेक्शनचे मोठे केमिकल ट्रायल केले जात आहे. तर काही प्रमाणांमध्ये या इंजेक्शनमुळे भरपूर सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, तरीही ट्रायलच्या निकालानंतरच यावर बोलणे योग्य ठरेल.  – डॉ. वॅन कॅरखॉव्ह


हेही वाचा – लहान मुले कोरोनाचे स्प्रेडर नाहीत, नवीन संशोधन समोर


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -