Honey Trap : हनी ट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला दिली गोपनीय माहिती; माझगाव डॉकमधील तरुणाला अटक

Honey Trap : हनी ट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला दिली गोपनीय माहिती; माझगाव डॉकमधील तरुणाला अटक

अलिबाग : अलिबागमध्ये रहाणार्‍या एका 31 वर्षीय तरुणाचे हनी ट्रॅपच्या जाळयात अडकूनभारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रातील भारतीय नौदलाशी संबंधित अत्यंत संवेदनशील माहिती पाकिस्तानी महिलेला पुरवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने तरुणाला माझगाव येथून अटक केली आहे. एटीएसने त्याच्या संपर्कातील इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून याची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती एटीएसचे प्रमुख सदानंद दाते यांनी दिली. (Confidential information was given to Pakistan by getting caught in the honey trap Youth arrested from Mazgaon dock in Alibag)

हेही वाचा – Raj Thackeray : वसंत मोरेंच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरेंचे पुण्यातील नेत्यांना आदेश

एटीएसने अटक केलेल्या तरुणाचे नाव कल्पेश बैकर असे असून तो मुळचा अलिबागच्या पोयनाड येथील रहिवासी आहे. 31 वर्षीय कल्पेशने कोकण एज्युकेशन सोसायटीच्या नाना पाटील हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे, तर आयटीआय फिटर ट्रेडचे प्रशिक्षण त्याने पूर्ण केले आहे. कल्पेश हा गेल्या दहा वर्षांपासून माझगाव डॉकयार्डमध्ये माझगाव डॉक शिपच्या बिल्डर्स लिमिटेड काम करत आहे.

कल्पेश अनेक महिन्यांपासून सोशल मीडियावर एका महिलेशी चॅटिंग करत होता आणि तो त्या तरुणीच्या हनी ट्रॅपमध्ये कधी अडकला त्याच त्यालाच समजलं नाही. त्याने तरुणीच्या सांगण्यावरून माझगाव डॉक येथील नौदलाच्या जहाजांची संवेदनशील माहिती पाकिस्तानी महिला हेराला दिल्याचे एटीएसच्या तपासात उघड झाले आहे.

 हेही वाचा – Rahul Shewale : मुंबईतील ब्रिटिशकालीन 7 रेल्वे स्थानकांचे नामांतर; राहुल शेवाळे यांची माहिती

दरम्यान, कल्पेश हा नोव्हेंबर 2019 ते 2023 या कालावधीत फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाकिस्तानी महिला हेराच्या संपर्कात होता. कल्पेशने फेसबुक व्हाट्सअ‍ॅप चॅटिंग करून पाकिस्तानी महिला हेराला भारतीय सुरक्षेची माहिती दिल्याचे एटीएसचे प्रमुख सदानंद दाते यांनी सांगितले. एटीएसने आरोपींविरुद्ध अधिकृत गुप्तता कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

First Published on: March 12, 2024 8:25 PM
Exit mobile version