घरमुंबईRaj Thackeray : वसंत मोरेंच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरेंचे पुण्यातील नेत्यांना आदेश

Raj Thackeray : वसंत मोरेंच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरेंचे पुण्यातील नेत्यांना आदेश

Subscribe

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे अर्थात तात्या मोरे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. “अखेरचा जय महाराष्ट्र… साहेब मला माफ करा” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या भावना व्यक्त केल्या. मनसेसोबत राहणे शक्य नसल्यामुळे पक्ष, संघटनेच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. आता परतीचे दोर कापले आहेत, असे सांगत वसंत मोरे भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे नेत्यांना आदेश दिले आहे. (After Vasant Mores resignation Raj Thackerays order to Pune leaders)

हेही वाचा – Vasant More : मनसेला पुण्यात बळ दिल्यानंतर 29 वर्षांनी सोडली राज ठाकरेंची साथ; कोण आहेत वसंत मोरे? 

- Advertisement -

वसंत मोरे यांनी राजीनामा दिल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांच्या राजीनाम्यावर कोणीही बोलू नका, असे आदेश पुणे शहरातील नेत्यांना दिले आहेत. राज ठाकरेंच्या आदेशानंतर पुणे शहरातील मनसे पदाधिकाऱ्यांनीही चुप्पी साधली आहे. मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि अजय शिंदे यांनी कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार दिला. मात्र यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, राज ठाकरे यांच्या आदेशानंतर वसंत मोरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यात येईल.

हेही वाचा –Rahul Shewale : मुंबईतील ब्रिटिशकालीन 7 रेल्वे स्थानकांचे नामांतर; राहुल शेवाळे यांची माहिती

- Advertisement -

दरम्यान, वसंत मोरे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, राज ठाकरे यांनी मागील महिन्यात महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघांचा अहवाल मागितला होता. त्यात शहरातील पदाधिकाऱ्यांनी पक्ष पुणे लोकसभा लढवण्याच्या स्थितीत नाही, असा नकारात्मक अहवाल राज ठाकरेंकडे पाठवला गेला. राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्याकडे माझ्याबद्दल नकारात्मक माहिती पुरवली जाते. पुणे लोकसभा लढवण्याची माझी इच्छा आहे. परंतु मनसेमध्ये चार जणांचीही लोकसभा लढवण्याची इच्छा आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी त्यांच्यापैकी एकाला तिकीट द्यावे आणि निवडून आणावे. कारण मी आता परतीचे दोर कापले आहेत, असे वसंत मोरे यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -