घरमुंबईRahul Shewale : मुंबईतील ब्रिटिशकालीन 7 रेल्वे स्थानकांचे नामांतर; राहुल शेवाळे यांची...

Rahul Shewale : मुंबईतील ब्रिटिशकालीन 7 रेल्वे स्थानकांचे नामांतर; राहुल शेवाळे यांची माहिती

Subscribe

मुंबई : शिवसेना खासदार आणि लोकसभा गटनेते राहुल शेवाळे यांनी मुंबईतील ब्रिटिशकालीन 7 रेल्वे स्थानकांची नाव बदलण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केला होता. यासंदर्भात राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तसेच उद्या होणाऱ्या राज्य मंत्री मंडळ बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती राहुल शेवाळे यांनी दिली आहे. (Renaming of 7 British Railway Stations in Mumbai Information from Rahul Shewale)

हेही वाचा – Borivali : इमारतीभोवती बांधलेले लोखंडी मचाण कोसळून तिघांचा मृत्यू, एक गंभीर

- Advertisement -

माध्यमांशी बोलताना राहुल शेवाळे म्हणाले की, आजच्या बैठकीमध्ये 7 रेल्वे स्टेशनचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. करीरोड स्टेशनचं नाव बदलून लालबाग, सँडहर्स्टचं नाव डोंगरी, मरीनलाईन्सचं नाव मुंबादेवी, चर्नीरोडचं नाव गिरगाव, कॉटनग्रीनचं नाव काळाचौकी, डॉकयार्ड रोडचं नाव माझगाव स्टेशन आणि किंग्ज सर्कलचं नाव तीर्थंकर पार्श्वनाथ रेल्वे स्टेशन करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती राहुल शेवाळे यांनी दिली. तसेच त्यांनी यासंदर्भात ट्वीट देखील केले आहे.

हेही वाचा – Rahul Gandhi : आता आदिवासींची जागा अदानींना देणार; राहुल गांधींचा भाजपावर निशाणा

- Advertisement -

मुंबईच्या रेल्वे स्थानकांना मिळणार नवी ओळख शिर्षक देत राहुल शेवाळे यांनी ट्वीट करताना म्हटले की, भारतीय पारतंत्र्याच्या खुणा पुसून टाकण्यासाठी केंद्र सरकार पुढाकार घेत असताना मुंबईतील रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे देखील बदलायला हवी, अशी मुंबईकरांची भावना होती. म्हणून यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत राज्य सरकारच्यावतीने या प्रस्तावाला तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे. या मागणीनुसर राज्य सरकारकडून केंद्र सरकारला प्रस्ताव सादर केला जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -